‘माझ्या नादाला लागू नको’, नागडा करेन; राऊतांच्या धमकीनंतर प्रफुल पटेलांची प्रतिक्रिया समोर…

Praful Patel Sanjay Raut On Dalal Statement : अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल (Praful Patel) यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केलीय. राऊतांनी प्रफुल पटेल यांना दलाल म्हटलंय. यावरून राजकीय वर्तुळात देखील प्रतिक्रिया उमटत आहेत. तर आता राऊतांच्या या विधानावर प्रफुल पटेल यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. दरम्यान राऊतांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात वातावरण तापलेलं आहे.
संजय राऊत यांनी माध्यमांसमोर प्रफुल पटेल दलाल, माझ्या नादाला लागू नको, नागडा करेन अशी धमकी दिली आहे. प्रफुल्ल पटेल, ज्यांनी बापाच्या पाठीत खंजिर खुपसला तो माणूस रंग बदलला म्हणतो. ज्या प्रफुल्ल पटेलांना मोदींनी (Maharashtra Politics) दाऊदचा हस्तक असल्याचा आरोप केला होता. त्यांच्यावर इडीची कारवाई झाली. आपली संपत्ती वाचवण्यासाठी भाजपमध्ये गेले, असा आरोप देखील संजय राऊत यांनी केला होता. अमित शहांनी वॉशिंगने पटेलांना धुवून घेतलं. अजित पवार यांनी स्वत:चं अवमुल्यन करुन घेतलंय. पटेलसारखे लोक दलाल असून त्यांनी आधी काँग्रेसची, दाऊदची दलाली केली असं वाटत असल्याची बोचरी टीका संजय राऊतांनी केली आहे.
तनिषा भिसे यांचा मृत्यू एक ‘सिस्टम अलर्ट’; सुनेत्रा पवारांच्या पोस्टनंतर अजितदादांना आली जाग
माझ्या चारित्र्यावर आणि इतिहासावर बोलण्याआधी आपण पवार साहेबांकडून माहिती घेतली असती तर बरं झालं असतं, अशी प्रतिक्रिया प्रफुल पटेल यांनी दिली आहे. X अकाउंटवर त्यांनी पोस्ट करत राऊतांना उत्तर दिलंय.
माझ्या चारित्र्यावर आणि इतिहासावर बोलण्याआधी आपण पवार साहेबांकडून माहिती घेतली असती तर बरं झालं असतं.@rautsanjay61
— Praful Patel (@praful_patel) April 4, 2025
अधिकृत दलाल म.वि.आ. या तीन पक्षामधील “लोमत्या” असा टोला अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेते, सूरज चव्हाण यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.
यांच्यापेक्षा राजकारणात अभिजित बिचकुले हा दर्जेदार आणि विश्वासहार्य माणूस आहे. राजकारणात पत्रकारितेपक्षा दलालीवर ओळख निर्माण करणाऱ्या संजय राऊत यांनी दुसऱ्याला दलालीचे प्रमाणपत्र वाटण्यापेक्षा स्वतःला आरशात पाहून बोलावे, अशी टीका सूरज चव्हाण यांनी केली आहे.
अधिकृत दलाल म.वि.आ. या तीन पक्षा मधला “लोमत्या” @rautsanjay61 यांच्यापेक्षा राजकारणात अभिजित बिचकुले हा दर्जेदार आणि विश्वासहार्य माणूस आहे.
राजकारणात पत्रकारितेपक्षा दलालीवर ओळख निर्माण करणाऱ्या संजय राऊत यांनी दुसऱ्याला दलालीचे प्रमाणपत्र वाटण्यापेक्षा स्वतःला आरशात पाहून…— Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण) (@surajvchavan) April 4, 2025
माझ्या नादाला लागू नको, मी नागडा करीन अशा शब्दांमध्ये संजय राऊत यांनी प्रफुल पटेलांना इशारा दिलाय. भाजपच्या लोकांना चमचेगिरी करून दाखवत होते. हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत, अशी टीका देखील राऊतांनी केलीय.