दीनानाथ रूग्णालयाला अवघे 1 रूपये भाडे, तरीही 10 लाखांचा हव्यास; RTI कार्यकर्ते कुभारांनी काढला कच्चाचिठ्ठा

Tanisha Bhise Death Case : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली. उपचाराला उशीर झाला होता. म्हणून भाजप आमदार अमित गोरखे यांचे पीए सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे (Tanisha Bhise Death Case) यांचा प्रसृतीच्या दरम्यान जुळ्या मुलींना जन्म देऊन मृत्यू झाला. या घटनेनंतर रुग्णालयाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. फक्त पैशांची हाव असणाऱ्या दीनानाथ मंगेशकर ह़ॉस्पिटलच्या मग्रूर प्रशासनाला नाममात्र दरात जमीन देण्याची काय गरज होती? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी विचारला आहे.
आत्ता आत्ता म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये राज्य शासनाने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पुण्यातील जवळपास आठ हजार चौरस फुट जागा वार्षिक नाम मात्र एक रुपया भाड्याने दिली आहे.यापूर्वी रुग्णालयासाठी दिलेली जमीन ही अशीच नामामात्र भाड्याने दिलेली आहे. आत्ता दिलेल्या जमिनीची किंमत… pic.twitter.com/lTCwY8ttUS
— Vijay Kumbhar (@VijayKumbhar62) April 4, 2025
18 फेब्रुवारी 2025 रोजी मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. या बैठकीत दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नाल्यावरील पुलाच्या बांधकामासाठी नाममात्र एक रुपया दराने वार्षिक भाडेतत्वावर जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याच निर्णयावर विजय कुंभार यांनी सडकून टीका केली आहे. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये कुंभार यांनी पुढे म्हटले आहे की, आत्ता आत्ता म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये राज्य शासनाने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पुण्यातील जवळपास आठ हजार चौरस फुट जागा वार्षिक नाममात्र एक रुपया भाड्याने दिली आहे.
यापूर्वी रुग्णालयासाठी दिलेली जमीन ही अशीच नाममात्र भाड्याने दिलेली आहे. आत्ता दिलेल्या जमिनीची किंमत सध्याच्या बाजार भावाने कमीत कमी १० कोटी रूपये तरी असेल. रुग्णालयाने मात्र १० लाख रूपये आगाउ भरले नाहीत म्हणून उपचार नाकारले आणि रूग्ण दगावला. काय अर्थ लावायचा या सगळ्यांचा? असा सवाल कुंभार यांनी विचारला.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने आधी पैसे भरले नाहीत म्हणून रुग्णावर उपचार नाकारले.हॉटेलमध्ये सुद्धा जेवण झाल्यानंतर बिल घेतात,गाडी दुरूस्त करणारासुद्धा काम झाल्यानंतर बिल घेतो.मात्र खाजगी रुग्णालयामध्ये पेशंटने आधी पैसे भरल्याशिवाय त्याला हात सुद्धा लावला जात नाही. त्याची काही कारणे…
— Vijay Kumbhar (@VijayKumbhar62) April 4, 2025
मंत्रिमंडळाचा निर्णय नेमका काय?
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर फाऊंडेशन ट्रस्टला हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटरला एरंवडणे येथे जमीन देण्यात आली आहे. तसेच ट्रस्टने कर्वेनगर येथील जमीन खरेदी केली आहे. या दोन्ही जमिनींच्या मधून एक नाला आहे. याच नाल्यावर एक पूल बांधण्याची गरज होती. या पुलाच्या बांधकामासाठी 795 चौरस मीटर जागेची मागणी ट्रस्टने केली होती. ट्रस्टच्या मागणीनुसार वार्षिक एक रुपया दराने जमीन देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. आता याच निर्णयावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे.