तनिषा भिसे मृ्त्यू प्रकरणाची मनपाकडून दखल; मंगेशकर रुग्णालयाकडे मागितला खुलासा

तनिषा भिसे मृ्त्यू प्रकरणाची मनपाकडून दखल; मंगेशकर रुग्णालयाकडे मागितला खुलासा

Tanisha Bhise Death Case : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयासंदर्भात एक मोठी बातमी समोर आलीय. उपचाराला उशीर झाला होता. म्हणून भाजप आमदार अमित गोरखे यांचे पीए सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा सुशांत भिसे यांचा प्रसृतीच्या दरम्यान जुळ्या मुलींना जन्म देऊन मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची पुणे महापालिकेने गंभीर दखल घेतली आहे. महापालिकेच्या आरोग्य प्रमुख निना बोराडे यांनी या घटनेची संपूर्ण माहिती मागवली आहे. रुग्णालयाने प्राथमिक चौकशी सादर केली आहे.

याबाबत काल मयत तनिषा भिसे यांच्या नातेवाईकांनी पत्रका परिषद घेतली. दीनानाथ रुग्णालयात गर्भवतीला जेव्हा रक्तश्राव होऊ लागला तेव्हा पूर्वी दिलेलीच औषध घेण्याचा सल्ला देण्यात आला. नाहीतर पूर्ण दहा लाख रुपये भरा तेव्हाच उपचार सुरू होतील. अशा स्पष्ट सूचना डॉक्टरांनी सर्व स्टाफला दिल्या होत्या. मग आम्ही 3 लाख घेऊन बिलिंग विभागात गेलो. मात्र पूर्ण पैसे नसल्यास रूग्णाला दाखल करणार नाही, असं सांगण्यात आलं. तुम्हाला परवडत नसल्यास ससूनला जा असा विचित्र सल्ला आम्हाला गर्भवती अत्यंत नाजून अवस्थेत असताना दिला गेला. हा सर्व प्रकार गर्भवतीने पाहिल्याने तिने त्याचा धसका घेतला आणि त्यामुळेच तिचा मृत्यू झाला असा आरोप या नातेवाईकांनी केला.

परवडत नसल्यास ससूनला जा; डॉक्टरांच्या सल्ल्याच्या धसक्याने गर्भवतीचा मृत्यू, पीडित नातेवाईकांचा आरोप

दोन जुळ्या मुलींना जन्म देऊन महिलेचा मृत्यू झालाय. तिथल्या प्रशासनाने झुगारून त्यांना अॅडमिशन दिलं नाही. त्या धावपळीत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं. दुसऱ्या रूग्णालयात गेल्यानंतर त्यांना उपचार मिळाले. त्याठिकाणी त्यांना दोन जुळ्या मुली देखील झाल्या. परंतु दुर्दैवाने त्या आईचा त्याठिकाणी मृत्यू झाला. दीनानाथ रूग्णालय हे गरिबांसाठी आहे. परंतु अशा प्रकारचा अत्यंत मोठा गुन्हा केलेला आहे. अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या आरोपांवर रुग्णालय प्रशासनाकडून अद्याप ठोस उत्तर मिळालेलं नाही.

आमदार गोरखे यांनीही केले गंभीर आरोप

स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी गर्भवती असताना दीनानाथ रुग्णालयात पैसे कमी असल्याने अॅडमिशन घेतलं नाही. रुग्णालयाकडून 10 लाख रुपये भरण्याचं सांगण्यात आलं. मात्र भिसे कुटुंबियांकडे तीन लाख रुपये असल्याने महिलेवर उपचार केले नाहीत. पर्यायी दुसऱ्या रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. यावेळी गर्भवती महिलेने दोन जुळ्या मुलींना जन्म दिला असून तनिषा भिसे यांचा मात्र मृत्यू झाला आहे. या मृत्यूला जबाबदार दीनानाथ रुग्णालय असून हा गंभीर प्रकारचा गुन्हा घडल्याप्रकरणी आम्ही अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचं आमदार अमित गोरखे यांनी स्पष्ट केलंय.

Pune News : गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी अधिवेशनात आवाज उठवणार, अमित गोरखे

follow us
  • fb
  • instagram
  • youtube