Anjali Damania Exclusive : धनंजय मुंडेंचं पालकमंत्री गेलचं, आता नंबर मंत्रीपदाचा?
Anjali Damania Exclusive : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, याच एका घटनेनंतर मंत्री धनंजय मुंडे यांना पालकमंत्री करू नये अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना यातून वगळण्यात आले. मात्र, सामजिक कार्यकर्त्या अंजली दामानिया यांनी धनंजय मुंडेंचा संपूर्ण कट्टाचिठ्ठाच काढल्याने आता मंत्रीपदही जातयं का? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लेटस्अप मराठीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत दामानिया यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे.