पुणे गर्भवती मृत्यूची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल; धर्मादाय सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत

CM Devendra Fadanvis order for Inquiry committee of Dinanath Mangeshkar Hospital case : पुण्यामध्ये नामांकित दीनानाथ मंगेशकर रूग्णालय प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला, (Pune News) असा आरोप केला जातोय. या प्रकारची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी धर्मादाय सहआयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
कशी आहे ही समिती?
धर्मादाय सहआयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेत या चौकशी समितीमध्ये उपसचिव श्रीमती यमुना जाधव, सह कक्षप्रमुख तथा कक्ष अधिकारी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय यांचे प्रतिनिधी, सर जे. जे. रुग्णालय समूह, मुंबईचे अधीक्षक हे सदस्य असतील तर विधि व न्याय विभागाचे उपसचिव/अवर सचिव हे या चौकशी समितीचे सदस्य सचिव असतील.
शेअर बाजारात ‘ब्लॅक फ्रायडे’…साडेनऊ लाख कोटी रुपयांचं नुकसान, मार्केट पडण्याचे प्रमुख 6 कारणे
त्याचप्रमाणे मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तयार करण्यात आलेल्या धर्मादाय रुग्ण योजनेची सर्व धर्मादाय रुग्णालयांकडून प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्रधान सचिव विधी व न्याय विभाग तसेच धर्मादाय आयुक्त यांना खालील प्रमाणे सूचना केल्या आहेत. धर्मादाय रूग्णालयातील आरक्षित खाटा निर्धन व दुर्बल घटकातील रूग्णांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी सर्व धर्मादाय रुग्णालयांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे ‘धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची’ मान्यता घ्यावी.
अन्न नाही, पाणी नाही…., तुर्की विमानतळावर 30 तास अडकले भारतीय; व्हिडिओ व्हायरल
याबाबत धर्मादाय रुग्णालयांना तत्काळ निर्देश देण्यात यावेत. विधी व न्याय विभागामार्फत गठीत करण्यात आलेल्या तपासणी पथकामार्फत तपासणी अहवाल व समितीच्या शिफारशी सादर केल्या आहेत. त्या शिफारशींवर तत्काळ कार्यवाही करावी. शासनामार्फत धर्मादाय रुग्णालयांमध्ये 186 धर्मादाय आरोग्य सेवकांच्या सेवा घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदर पदे तात्काळ भरण्यात यावीत. निर्धन रुग्णनिधी (IPF) खात्याबाबतची अद्ययावत माहिती धर्मादाय रुग्णालयांकडून घेवून ती धर्मादाय आयुक्त यांच्या संकेतस्थळावर अद्ययावत करावी. योजनेची अंमलबजावणी न करणाऱ्या रुणालयांवर मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार कठोर कारवाई करावी. अशा सुचना देण्यात आल्या आहेत.
काय आहे नेमकं प्रकरण?
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर (Dinanath Hospital) रूग्णालयासंदर्भात एक मोठी बातमी समोर आलीय. दीनानाथ रूग्णालयाच्या मुजोरीमुळेच गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जातोय. हा आरोप भाजप आमदार अमित गोरखे यांनी केलाय. आमदार अमित गोरखे (pregnant woman death) यांची पीए सुशांत भिसे यांच्या त्या पत्नी होत्या. दीनानाथ रूग्णालयात अॅडमिट करण्यासाठी दहा लाखांची मागणी केली जात होती. रूग्ण गंभीर असताना देखील अॅडमिट करून घेतलं नाही, असा आरोप भाजप (BJP) आमदार अमित गोरखे यांनी केलाय.
अभिनेते मनोज कुमार आणि शिर्डीचं नात अतूट होतं; मंत्री विखे पाटीलांनी जागवल्या आठवणी
दोन जुळ्या मुलींना जन्म देऊन महिलेचा मृत्यू झालाय. तिथल्या प्रशासनाने झुगारून त्यांना अॅडमिशन दिलं नाही. त्या धावपळीत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं. दुसऱ्या रूग्णालयात गेल्यानंतर त्यांना उपचार मिळाले. त्याठिकाणी त्यांना दोन जुळ्या मुली देखील झाल्या. परंतु दुर्दैवाने त्या आईचा त्याठिकाणी मृत्यू झालाय. दीनानाथ रूग्णालय हे गरिबांसाठी आहे. परंतु अशा प्रकारचा अत्यंत गुन्हा केलेला आहे. अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.