आरोग्य विभागाला जाग, दिनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणात कारवाईला सुरुवात

आरोग्य विभागाला जाग, दिनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणात कारवाईला सुरुवात

Deenanath Mangeshkar Hospital :  दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Deenanath Mangeshkar Hospital) घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर आता आरोग्य विभागाने झाडाझडतीला सुरुवात केली आहे. पुणे महानगरपालिका (PMC) आरोग्य विभागाने मोठा निर्णय घेत कुटुंब कल्याण विभागाच्या अतिरीक्त संचालक डॅाक्टर बबिता कमलापुरकर (Babita Kamalapurkar) यांच्याकडील पदभार काढला आहे. गेल्या काही दिवसांपासून बबिता कमलापुरकर यांच्याकडे कुटुंब कल्याण विभागाचा अतिरीक्त पदभार होता.

कुटुंब कल्याण विभागाकडे माता मृत्यु रोखण्याची मुख्य जबाबदारी असते. अतिरीक्त संचालक डॅाक्टर बबिता कमलापुरकर यांच्याकडील पदभार काढून  डॅाक्टर संदीप सांगळे (Sandeep Sangle) यांच्याकडे पदभार देण्यात आले आहे मात्र आता देखील या महत्वाच्या पदावर पुर्णवेळ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात न आल्याने आरोग्य विभागावर टीका देखील होत आहे.

तर दुसरीकडे कुटुंब कल्याण विभागाचे अतिरिक्त पदभार काढल्यानंतर डॅाक्टर बबिता कमलापुरकर यांच्याकडे आता फक्त पुण्याचा आरोग्य विभागाच्या सहसंचालक पदाचा कार्यभार असणार आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेनंतर कमलापुरकर यांना पदावरुन हटवण्यात आल्यानंतर आरोग्य विभागाकडुन कारवाईला सुरवात झाल्याची चर्चा सध्या पुण्यात सुरु झाली आहे.

माजी आयपीएस शिवदीप लांडे राजकारणात; ‘हिंदू सेना’ पक्षाची स्थापना

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तनिषा भिसे (Tanisha Bhise) या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याने रुग्णालयावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत होती. या प्रकरणात भिसे  कुटुंबीयांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेऊन या प्रकरणात कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती. तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असं आश्वासन कुटुंबियांना दिलं होते.

“फुले” चित्रपटाच्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट

follow us
  • fb
  • instagram
  • youtube