दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरण, लायसन रद्द करा अन्…, भिसे कुटुंबियांची CM फडणवीसांकडे मागणी

Deenanath Mangeshkar Hospital : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरून (Deenanath Mangeshkar Hospital) सध्या राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तनिषा भिसे (Tanisha Bhise) या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भिसे कुटुंबियांकडून रुग्णालयावर गंभीर आरोप करण्यात आले आहे. तर या प्रकरणात भिसे कुटुंबीयांनी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असं आश्वासन कुटुंबियांना दिलं. यानंतर भिसे कुटुंबीयांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
आमचा प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे. ते आम्हाला न्याय मिळवून देतील, मुख्यमंत्री म्हणाले, तुम्हाला न्याय देऊ. आमच्या वहिणींसोबत जसं झालंय तसं कुठल्याही इतर महिलेसोबत होऊ नये. ते हॉस्पिटल धर्मादायी व्हायला हवं अशी प्रतिक्रिया मृतक तनिषा भिसे यांच्या नणंदने माध्यमांशी बोलताना दिली.
डॉक्टर घैसासचे लायसन रद्द करा
जी माहिती आम्ही सुरुवातीपासून सांगत आहोत तिच माहिती आम्ही पोलीस प्रशासनाला दिली आहे. ज्या गोष्टी आमच्या सोबत घडल्या त्या सर्व पोलीस प्रशासनाला सांगितला. आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो मुख्यमंत्र्यांनी सांगितलं घडलेला प्रकार हा खूप संवेदनशील असून याच्या वरती नक्कीच कारवाई होईल आणि भविष्यात अशा तनिषा घडणार नाहीत याची खबरदारी घेतली जाईल. रोष फक्त एका व्यक्तीवर नाही तर संपूर्ण व्यवस्थेवर आहे.
राज ठाकरे भाजीवाला, ऑटोवाल्यांना अनुदान देत नाही; गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
हा लढा फक्त माझ्या एकट्याचा राहिला नसून संपूर्ण जनतेचा हा लढा झाला आहे. डॉक्टर घैसासचे लायसन रद्द करण्यात याव अशी आमची मागणी आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो आहे त्यांनी आम्हाला आश्वासन दिल आहे तुम्हाला न्याय मिळवून देऊ. अशी प्रतिक्रिया भिसे कुटुंबियांनी दिली.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाचा माज सरकार उतरवणार का? आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल