दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाचा माज सरकार उतरवणार का? आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाचा माज सरकार उतरवणार का? आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल

Aaditya Thackeray On Deenanath Mangeshkar Hospital  : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात ( Deenanath Mangeshkar Hospital) घडलेल्या घटनेनंतर विरोधक राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहे. तर या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी चौकशीचे आदेश देखील दिले आहे. तर आता या प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते आज मुंबई येथे आयोजिक पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

रुग्णालय प्रशासनाचा माज, मस्ती सरकार उतरवणार का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सरकारला विचारला तसेच सरकार हॉस्पिटल प्रशासनाला जाब विचारणार आहे की नाही असा प्रश्न देखील यावेळी आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. तर त्यांनी यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत फडणवीस कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकत नाहीत असा दावा केला आहे.

राज्यात सरकार भाजपच आहे मात्र तरीही देखील भाजपचे कार्यकर्ते हॉस्पिटलमध्ये जाऊन तोडफोड करत आहे. न्यायाची मागणी करत आहे असं म्हणत फडणवीस कार्यकर्त्यांना न्याय मिळून देणार नाही असा टोला लावला.

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, गेल्या दोन दिवंसापासून या घटनेविरोधात आंदोलने होत आहे मात्र तरीही देखील या प्रकरणात सरकारकडून कारवाई होताना दिसत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळून देऊ शकत नाही तर सामान्य माणसांनी काय अपेक्षा करावी? बीड प्रकरणात देखील संतोष देशमुख यांना न्याय मिळाला नाही ते प्रकरण देखील सुरुच आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले.

… अन् तेव्हा मी भारत सोडण्याचा निर्णय घेतला, करुणा शर्मांचा धनंजय मुंडेंवर धक्कादायक खुलासा

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एक गर्भवती महिला होती. एक कठीण परिस्थितीत होती मात्र हॉस्पिटलकडून या महिलेला 10  लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती त्यामुळे सरकार हॉस्पिटल प्रशासनाला जाब विचारणार का? असा प्रश्न त्यांनी यावेळी सरकारला विचारला. तसेच सरकार रुग्णालय प्रशासनाचा माज, मस्ती उतरवणार का? असा सवालही यावेळी आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube