चिकन, स्पेशल चहा, झोपायला 6 ब्लॅंकेट… वाल्मिक कराडला जेलमध्ये VIP ट्रिटमेंट, तुरुंगवारी करून परतलेल्या कासलेंचा गंभीर आरोप

Ranjit Kasle Allegation Walmik Karad Get VIP Treatment In Jail : परळीचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) अन् वाल्मिक कराड (Walmik Karad) यांच्याबाबत गौप्यस्फोट करणारे बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले यांना ( Ranjit Kasle) जामीन मिळाला आहे. जामीन मिळाल्यानंतर कासले यांचा पहिलाच व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत कासलेंनी म्हटलंय की, सगळे गद्दार निघाले पण जनता मायबाप निघाली. माझी बेल होवून आठ दिवस झाले. या सगळ्यात माझ्या कुटुंबाला सगळ्यात जास्त त्रास झाला. मला धमक्या दिल्या जात आहेत, असं देखील कासलेंनी म्हटलंय.
भारतानं रचला इतिहास! जपानला पछाडत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था; आता तीनच देशांचं आव्हान
मला स्टंटबाजी करायची असती तर कराडचं एनकाउंटर केलं नसतं का, असं देखील कासलेंनी व्हिडिओमध्ये म्हटलंय. कासले यांनी बिहारमध्ये असल्याचं म्हटलंय. मला बीडमधल्या सबजेलमध्ये ठेवलं होतं. तिथे वाल्मिक कराडला (Beed News) चहा आला, तो देखील कपामध्ये. अन् मला प्लास्टिकमध्ये चहा देण्यात आला. त्यावेळी मला लगाच लक्षात आलं की, हे सगळे मॅनेज झालेलं आहे. पंचवीस हजाराची कॅंटीन तो स्वत:च्या नावावर घेतो, असा आरोप रणजीत कासले यांनी केलाय.
फक्त अडीच दिवसांत मॅच संपली! कसोटी सामन्यात झिम्बाब्वेचा धुव्वा; इंग्लंडचा दणदणीत विजय
मित्रांनो, लगेच त्याने अर्ज केला. कासले इथं येवून उद्योग-धंदे करायला लागले, येथून त्याला हलवा. सुरक्षेच्या कारणास्तव बंद जेलमधून मला हलविण्यात आलं. अंजली दमानिया, करूणा मुंडे, तृप्ती देसाई यांच्याकडे कासले यांनी विनंती केलीय, की वाल्मिक कराडला तेथून हलवा. चिकन, तिन लेयरची चपाती, फरसाण असा सगळा राजेशाही थाट वाल्किक कराडचा आहे, असं देखील कासलेंनी सांगितलंय.
जेलमध्ये वाल्मिक कराड दोन-तीन ठिकाणी फिरतो. त्याला वाचण्यासाठी पाच-पाच पेपर येतात. त्याच्या सोबत वंजारी समाजाची लोकं असतात. बीड सबजेल हे कराडसाठी स्वर्ग असल्याचं कासलेंनी म्हटलंय. त्याला पांघरण्यासाठी सहा ब्लॅंकेट मिळाले असून तो त्यांचा गादीसारखा वापर करतो. कॅंटीनमध्ये इतर कैद्यांना खरेदीचा नियम लावलो जातो, मात्र कराड पंचवीस हजाराची खरेदी करतो, असं देखील त्यांनी म्हटलंय. इतर कैद्यांपेक्षा वाल्मिक कराडला व्हिआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याचं त्यांनी म्हटलंय.