Ravindra Chavan Exclusive : बडगुजरांनंतर आता दाऊदला भाजपात रेडकार्पेट? चव्हाणांनी सांगितला पक्षप्रवेशाचा फॉर्मुला…

Ravindra Chavan Exclusive : भाजपचे (BJP) नवीन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी (Ravindra Chavan) लेट्सअप सभा कार्यक्रमात मुलाखत दिली. यावेळी त्यांनी भाजपचं हिंदुत्व अन् राष्ट्रीयत्वाचं धोरण यावर भाष्य केलं आहे. जर उद्या हिंदुत्वाच्या नावाखाली दाऊद इब्राहिमने (Dawood Ibrahim) भाजपात प्रवेश मागितला तर, यावर देखील चव्हाण यांनी सडेतोड उत्तर दिलंय.
मोक्यातील आरोपीत कोणतं राष्ट्रीयत्व?
राष्ट्रीयत्व म्हणजे काय? अनेकदा मोक्यातील आरोपी येतो, तो राष्ट्रियत्वासाठी आल्याचं सांगितलं जातंय. मोक्याच्या आरोपीत नेमकं काय राष्ट्रीयत्व पाहिलेलं असतं, ज्याला तुम्हाला घ्यावं वाटतं, असा सवाल यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan News) यांना करण्यात आला. यावेळी बोलताना चव्हाण यांनी म्हटलंय की, यामध्ये अनेक गोष्टी आहेत. राष्ट्रियत्व म्हणजे भारतीय जनता पार्टी राष्ट्र प्रथम म्हणून विचार करते. नंतर पक्ष आणि त्यानंतर स्वत:, असा विचार करते. परम वैभवाच्या दिशेने राष्ट्राला घेवून जाण्याची भूमिका भारतीय जनता पार्टीची राहिली आहे. राष्ट्राला आवश्यक असणारे निर्णय, जसं की काश्मीरबाबत घेतला गेला.
Ravindra Chavan Exclusive : हिंदीसक्तीवरून भाजपची कोंडी ते फडणवीसांची स्पेशल स्क्रिप्ट
प्रत्येक भारतीयाच्या मनात
पहलगामचा हल्ला झाल्यानंतर उजवा असो किंवा डावा असो, सिंदूर ऑपरेशनच्या वेळी सगळ्यांमध्ये राष्ट्रीयत्व जाहीर झालं. प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रियत्वाची भावना जागं करणं योग्य की अयोग्य, हे आपण समजून घेतलं पाहिजे. पंतप्रधान मोदी यांनी 130 कोटी भारतीयांच्या मनात राष्ट्रियत्व रूजवलं आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या मनात ही भूमिका राष्ट्राच्या दिशेने घेत असतील, तर ते योग्य आहे.
भूमिका ऑपरेशन सिंदूरनंतरची
सुधाकर बडगुजर त्यांचा मुलगा हे मकोकातील आरोपी होते. ते दाऊदसोबत आरोपी होते, असा आरोप भारतीय जनता पार्टीने केला होता. आता गिते वैगेरे नेते पक्षात आलेत, त्यांच्यावर खंडणी मकोकाचे गुन्हे होते. यावर बोलताना रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय की, ही भूमिका ऑपरेशन सिंदूरनंतरची आहे. त्यांच्यातील राष्ट्रीयत्व जागं झालं आहे. जर कोणी सांगितलं की, आम्हाला तुमच्या सर्व भूमिकांसोबत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायचा आहे, तर काय? ते ठीक आहे. उद्या जर दाऊद इब्राहिमने जरी हिंदुत्व, राष्ट्रीयत्व म्हणून अर्ज केला तरी घ्यायला कमी केलं जाणार नाही, अशी चर्चा आहे. यावर रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय की, ही भूमिका डाव्यांची आहे. तर घुसून मारू ही आमची भूमिका आहे. दुसरे काय म्हणतात दाऊद असेल तिथे घुसून मारण्याची आमची भूमिका आहे. याअगोदर ही भूमिका कोणी घेतलेली नाही. देशात अतिरेकी कारवाया सातत्याने होत होत्या, त्या बंद करण्याचं काम एनडीएच्या सरकारने केलं आहे.