Ravindra Dhangekar : …पण पुण्याला जनतेचा मोहोळ हवाय मोदींचा नाही; धंगेकरांचा मोहोळ यांना टोला

Ravindra Dhangekar : …पण पुण्याला जनतेचा मोहोळ हवाय मोदींचा नाही;  धंगेकरांचा मोहोळ यांना टोला

Ravindra Dhangekar : आगामी लोकसभा निवडणुकांच्या ( Loksabha Elections 2024 ) पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले असून भाजपकडून महाराष्ट्रातील 20 जागांवरील उमेदवारांची घोषणा करण्यात आली त्यामध्ये पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर झाली त्यावर काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar ) यांनी मोहोळ यांना टोला लगावला आहे. धंगेकर म्हणाले की, मोहोळ म्हणत आहेत ते खर आहे लढत एकतर्फीच होईल पण जनता ठरवेल जनता उत्तर देईल. कारण पुण्याला जनतेचा मोहोळ हवाय मोदींचा मोहळ नकोय.

New EV Policy : भारतात टेस्लाची एन्ट्री फिक्स; मोदी सरकारनं जाहीर केली नवी EV पॉलिसी

आज ( शुक्रवार) काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना मोहोळ यांच्या पुणे लोकसभेबाबतच्या एका वक्तव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना धंगेकर म्हणाले की, मुरलीधर मोहोळ म्हणत आहेत. ते खर आहे. लढत एकतर्फीच होईल. पण जनता ठरवेल जनता उत्तर देईल. कारण पुण्याला जनतेचा मोहोळ हवाय मोदीचा मोहोळ नको. जनतेचा मोहोळ पाहिजे मोदींचा मोहोळ काहीच कामाचा नाही. असा टोला यावेळी धंगेकर यांनी मोहोळ यांना लगावला आहे.

Pune Loksabha : वसंत मोरेंसाठी आमदार धंगेकर माघार घेणार? धंगेकर म्हणतात…

तर पुणे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी आपल्या प्रचाराला सुरूवात केली आहे. त्यावेळी बोलताना मोहोळ म्हणाले होते की, पुण्यातील निवडणुक एकतर्फी होईल. तसेच त्यामध्ये आपलाच विजय होईल. त्यावरून धंगेकर यांनी मोहोळ यांना टोला लगावला आहे.

Loksabha Election : देशासह महाराष्ट्रात भाजपाची गाडी सुस्साट; निवडणुकांपूर्वीच अर्धी लढाई खिशात

तसेच यावेळी बोलताना धंगेकर यांनी महायुतीवर प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, महायुतीचा तिढा आजही कायम आहे. महायुतीच्याया जागा कमी जाहीर झाल्या आहेत. भाजप ,शिवसेना आणि राष्ट्रवादी त्यांची पुर्ण युती अजूनही झाली नाही. भाजपला ज्या वाटतात त्याच जागा त्यांनी जाहीर केल्या आहेत. तर आपल्या उमेदवारीबद्दल तसेच वसंत मोरेंना महाविकास आघाडीकडून उमेदवारी दिली जाणार त्यावर बोलताना ते म्हणाले की, कुणाला पक्षात घ्यायचं कुणाला उमदेवारी द्यायची याचा निर्णय पक्ष घेईल. मी कार्यकर्ता म्हणून काम करेल. पक्ष सांगेल त्याचा प्रचार करणार. कुणालाही उमेदवारी दिली तरी कार्यकर्ता म्हणून मी काम करेल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज