Loksabha Election : देशासह महाराष्ट्रात भाजपाची गाडी सुस्साट; निवडणुकांपूर्वीच अर्धी लढाई खिशात

Loksabha Election : देशासह महाराष्ट्रात भाजपाची गाडी सुस्साट; निवडणुकांपूर्वीच अर्धी लढाई खिशात

Loksabha Election : देशात लोकसभा निवडणुकांचं वातावरण (Loksabha Election) आहे. निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची (Election Commission) घोषणाही होईल. मात्र त्याआधीच राजकीय पक्षांत घमासान सुरू झाले आहे. विजयाचे दावे प्रतिदावे केले जात आहेत. काही निवडणूक पूर्व सर्व्हे येत आहेत. आताही असा एक सर्व्हे आला आहे ज्यात भाजपप्रणित एनडीए आघाडी 400 पेक्षा जास्त जागा मिळवू शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रातही सत्ताधाऱ्यांच्या बाजूने जनमत असून महायुती राज्यातील 48 पैकी 41 जागा जिंकू शकते, असा अंदाज या सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे.

Lok Sabha Election : महायुतीत धक्कातंत्र? 12 खासदारांना दणका, 8 भाजप उमेदवारांची यादी ‘रेडी’

नेटवर्क 18 ने केलेल्या ओपिनियन पोलमध्ये एनडीए आघाडीला 411 जागा मिळू शकतात असे म्हटले आहे. लोकसभेत 543 जागा आहेत. यंदा निवडणुकीत एकट्या भाजपला 370 पेक्षा जास्त जागा मिळतील असा दावा भाजप नेते करत आहेत. मात्र त्यांचा हा दावा सफल होणार आहे असा अंदाज या सर्वेतून व्यक्त करण्यात आला आहे. निवडणुकीत एकट्या भाजपला 350 जागा मिळू शकतात.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) उत्तर प्रदेशात 80 पैकी 70, मध्य प्रदेशात 28 (28), छत्तीसगडमध्ये 10, बिहार 38, झारखंड 12, कर्नाटक 25, तामिळनाडू 5, केरळमध्ये 2 जागा मिळू शकतात. या व्यतिरिक्त ओडिशात 13, पश्चिम बंगालमध्ये 25, तेलंगणात 8, आंध्र प्रदेशात 18 तर गुजरात राज्यात 26 जागा एनडीएला मिळण्याची शक्यता आहे. विरोधी इंडिया आघाडीला 105 जागा मिळण्याचा अंदाज आहे. देशातील सर्वात मोठा पक्ष काँग्रेसची याही निवडणुकीत वाटचाल बिकटच आहे. या सर्वेनुसार काँग्रेसला फक्त 49 जागा मिळू शकतात. मागील निवडणुकीत काँग्रेसला फक्त 44 जागा जिंकता आल्या होत्या.

Lok Sabha Election 2024 : एबीपी सी वोटरचा ओपिनियन पोल जाहीर, दक्षिणेत भाजपची वाट बिकटच!

महाराष्ट्रात महायुतीचाच आव्वाज 

न्यूज 18 च्या सर्वेनुसार महायुती महाराष्ट्रात दमदार कामगिरी करताना दिसत आहे. राज्यातील लोकसभेच्या 48 पैकी 41 जागा महायुती जिंकू शकते. तर महाविकास आघाडीला फक्त 7 जागा मिळू शकतात असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सर्वेक्षणानुसार एनडीए 48 टक्के मतांसह विजयी होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना, अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्रित निवडणूक लढणार आहेत.

मागील निवडणुकीत भाजपने 23 जागा जिंकल्या होत्या. तर शिवसेनेने 18 जागा जिंकल्या होत्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 4 जागा जिंकल्या होत्या. आता या निवडणुकीसाठी अद्याप महायुतीचं जागावाटप निश्चित झालेलं नाही. भाजप 30 पेक्षा जास्त जागा लढण्यास इच्छुक आहे. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी जोर लावला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज