बिहार विधानसभा निवडणूक 2025: एनडीएचा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर, महाराष्ट्र पॅटर्न…
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएने जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे.

Bihar Election 2025 NDA Seat Sharing Formula : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएने जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे. दिल्लीमध्ये झालेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर निर्णय झाला की, भाजप 101 जागा आणि जनता दल युनायटेड (जेडीयू) 101 जागा लढवणार आहेत. याशिवाय, चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ति पार्टी (आर) कडून 29 जागा, उपेंद्र कुशवाह यांच्या आरएलएम पक्षाकडून 6 जागा आणि जितन राम मांझी यांच्या एचएएम पक्षाकडून 6 जागा लढवण्यात येणार आहेत.
जागावाटप जाहीर
एनडीएच्या जागावाटपाची माहिती युतीतील (Bihar Election 2025) नेत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून जाहीर केली आहे. यामध्ये जेडीयूचे कार्यकारी अध्यक्ष संजय झा, आरएलएमचे प्रमुख उपेंद्र कुशवाह, केंद्रीय मंत्री चिराग पासवान आणि बिहार भाजपचे अध्यक्ष दिलीप जयस्वाल यांचा समावेश होता. जागावाटप जाहीर झाल्यानंतर आता युतीतील पक्षांकडून उमेदवारांची यादी लवकरच घोषित होणार आहे. भाजपची यादी जवळजवळ निश्चित असून, रविवारी दिल्लीत झालेल्या केंद्रीय (NDA Seat Sharing) निवडणूक समितीच्या बैठकीत अंतिम शिक्का बसण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार (Election) यांच्या जेडीयूने देखील आपले उमेदवार निश्चित केले असून, लवकरच अधिकृत घोषणा होईल.
बिहार विधानसभा निवडणूकीचे वेळापत्रक
बिहार विधानसभेची निवडणूक दोन टप्प्यांमध्ये होणार आहे. पहिला टप्पा 6 नोव्हेंबर आणि दुसरा टप्पा 11 नोव्हेंबर रोजी मतदान होईल. निवडणूक निकाल 14 नोव्हेंबरला जाहीर केला जाणार आहे. विधानसभेच्या एकूण 243 जागांपैकी 203 जागा सामान्य प्रवर्गासाठी, 38 जागा अनुसूचित जातीसाठी आणि 2 जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत.
बिहारमध्ये नवं सरकार?
बिहारमध्ये सुमारे 3.92 कोटी पुरुष आणि 3.40 कोटी महिला मतदार आहेत. यामध्ये 14 लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत, तर 14 हजार मतदार हे 100 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. यंदाच्या निवडणुकीत मतदानाची प्रक्रियाही सुरळीत पार पडेल, यासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. बिहारमध्ये नवं सरकार निवडणूक निकालानंतर लवकरच स्थापीत होण्याची शक्यता आहे.