Lok Sabha Election : महायुतीत धक्कातंत्र? 12 खासदारांना दणका, 8 भाजप उमेदवारांची यादी ‘रेडी’

Lok Sabha Election : महायुतीत धक्कातंत्र? 12 खासदारांना दणका, 8 भाजप उमेदवारांची यादी ‘रेडी’

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या असताना (Lok Sabha Election) महायुतीतील जागावाटप फायनल झालेलं नाही. तर दुसरीकडे भाजपकडून तिकीट कुणाला द्यायचं हा प्रश्नही अनुत्तरीत आहे. फक्त चर्चा सुरू आहेत. याच पार्श्वभुमीवर भाजपाच्या केंद्रीय निवडणूक बोर्डाची बैठक राजधानी दिल्लीत पार पडली. या बैठकीत राज्यातील जागांबाबत चर्चा करण्यात आली. तसेच काही उमेदवारांची नावं फायनल करुन सीईसीकडे पाठविण्यात आली. तर उमेदवारी जाहीर करताना भाजप धक्कातंत्राचा वापर करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली.

या बैठकीत राज्यातील 25 जागांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये पराभूत झालेल्या दोन जागांचाही समावेश होता. या चर्चेनंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एक यादी जाहीर केली. या यादीतील काही नावांची घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे. या बैठकीत काही उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आदी उपस्थित होते.

महायुतीतील वाद उफाळला: शिवतारेंना आवरा, अजितदादांच्या शिलेदाराचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा

बैठकीत ‘या’ उमेदवारांचं तिकीट फायनल?

या बैठकीत काही आठ उमेदवारांची तिकीटे फायनल करण्यात आली. यामध्ये नागपूरमधून नितीन गडकरी, जालनामधून रावसाहेब दानवे, चंद्रपूरसाठी सुधीर मुनगंटीवार, पुण्यातून मुरलीधर मोहोळ, सांगली मतदारसंघातून संजय काका पाटील, भिवंडीतून कपिल पाटील, दिंडोरीसाठी भारती पवार आणि बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. दरम्यान, बीड लोकसभा मतदारसंघातून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या बहिण प्रितम मुंडे या खासदार आहेत. परंतु, या मतदारसंघात आता पंकजा मुंडेंना तिकीट देण्याची चर्चा भारतीय जनता पार्टीत सुरू आहे. जर पंकजा मुंडेंनाच उमेदवारी मिळाली तर पुढे काय राजकीय घडामोडी घडतात,  पंकजा मुंडे बहिणीच्या जागी तिकीट स्वीकारणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

12 विद्यमान खासदारांना मिळणार नारळ

याआधी भारतीय जनता पार्टीने 17 राज्यांतील 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. यामध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश नव्हता. महायुतीत जागावाटपाचा निर्णय होत नसल्याने उमेदवार जाहीर करता आले नव्हते. अजूनही काही जागांवर पेच निर्माण झाला आहे.  तरी देखील भाजपने आघाडी घेत काही विद्यमान खासदारांना दणका देण्याचे ठरवले आहे. त्यानुसार भाजपाचे पाच तर अन्य पक्षांतील सहा विद्यमान खासदारांचे तिकीट कापले जाणार असल्याची माहिती आहे. आता कोणत्या खासदारांना डच्चू मिळणार हे लवकरच स्पष्ट होईल.

“आमची ताकद काय, लोकसभा निवडणुकीत कळेलच”; जानकरांचा भाजपला रोखठोक इशारा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज