Pune Loksabha : वसंत मोरेंसाठी आमदार धंगेकर माघार घेणार? धंगेकर म्हणतात…

Pune Loksabha : वसंत मोरेंसाठी आमदार धंगेकर माघार घेणार? धंगेकर म्हणतात…

Ravindra Dhangekar : भाजपने पुणे लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. गेले दोन टर्म पुण्यात भाजपचे उमेदवार विजयी होत आहेत. आताही भाजपने मोहोळांच्या माध्यमातून विजयाची हॅट्ट्रिक करण्याचा निर्धार केला आहे. मोहोळ यांच्या विरोधात अद्याप महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) उमेदवाराची घोषणा केली नाही. मविआत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आहे. त्यासाठी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकरांचं (Ravindra Dhangekar) नाव चर्चेत आहे. अशातच वसंत मोरेंनी (Vasant More) मनसेला रामराम ठोकून ते मविआच्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत. आपणही लोकसभा लढणार अशी घोषणा त्यांनी केली त्यावर आता रवींद्र धंगेकर यांनी भाष्य केलं.

Loksabha Election : देशासह महाराष्ट्रात भाजपाची गाडी सुस्साट; निवडणुकांपूर्वीच अर्धी लढाई खिशात 

वसंत मोरे हे सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. गुरुवारी मोरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर मोरे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. त्यामुळे मविआ वसंत मोरे यांना उमेदवारी देणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, धंगेकर यांनी लेट्सअप मराठीशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, अजित पवार गट आणि शिंदे गटाला विचारता न घेता भाजपने उमदेवारीर जाहीर केली. हा त्यांच्या मित्रपक्षांचा अपमान आहे. पण काँग्रेस मित्रपक्षांचा विचार करून निर्णय घेते. सगळ्यांना विचारात घेऊन कॉंग्रेस निर्णय घेणार आहे, असं धंगेकर म्हणाले.

Shreya Bugde : लाफ्टर क्वीन श्रेयाचं नवं फोटोशूट, साडीतल्या लूकने वेधलं लक्ष 

वसंत मोरे कॉंग्रेसमध्ये आले तर त्यांच्यासाठी माघार घेणार का, असा सवाल विचारताच धंगेकर म्हणाले, वसंत मोरे आणि मी एका पक्षात काम केले आहे. वसंत मोरे काँग्रेसमध्ये येत असतील तर त्यांचे स्वागत आहे. कोणाला उमेदवारी द्यायची हा निर्णय पक्ष घेत असतो. पक्षाच्या वाढीसाठी कार्यकर्त्यांची गरज आहे, तसा पक्षाच प्रमुख निर्णय घेतील. मी काँग्रेसचा उमेदवार नाही. अद्याप पक्षाने मला उमेदवारी जाहीर केली नाही. माझ्यासह २० जणांनी उमेदवारी मागितली आहे. काँग्रेस पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याच्या पाठीशी उभे राहण्यास मी तयार आहे. मी मित्रासाठी नाही तर काँग्रेस पक्षासाठी माघार घ्यायला तयार आहे, असं धंगेकर म्हणाले.

दरम्यान, पुण्यात मोदींचं मोहोळ आलेल, अजून पुणेकरांचे मोहोळ उठले नाही. ते ज्या दिवसी उठेल तेव्हा भाजपला आणि त्यांच्या नेत्यांना रणांगणातून पळ काढावा लागेल. जनता लाट आहे, फक्त उमेदवारी जाहीर होऊ द्या, मग पुणेकरांचे मोहोळ उठेल ते बघा, असा इशारा धंगेकर यांनी दिला.

भाजपने मोहोळ यांना उमेदवारी जाहीर केल्यानं आता त्यांच्या विरोधात कॉंग्रेस कोणाला रिंगणात उतरणार हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज