मुरलीधर मोहोळ यांनी बाजी का मारली? जाणून घ्या पाच कारणे…
Muralidhar Mohol : लोकसभा निवडणुक (Lok Sabha Elections) जाहीर होण्यास अवघे काही दिवस उरले असतांना भाजपकडून (BJP) उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत भारतीय जनता पक्षाने माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांना पुण्यातून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान, भाजपने मोहोळ यांना उमेदवारी देण्यामागे नेमकी काय कारणं आहेत, याच विषयी जाणून घेऊ.
‘जनतेच्या विश्वासाची पावतीच’; उमेदवारी मिळताच भारती पवारांची पहिली प्रतिक्रिया
लोकसभा निवडणुकीत मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी मिळणार, अशी चर्चा सुरुवातीपासून होती. याशिवाय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी राष्ट्रीय प्रचारक सुनील देवधर, माजी आमदार जगदीश मुळिक यांच्याही नावांची चर्चा होती. मोहोळ आणि मुळीक हे लोकसभेचे प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र, अखेर भाजपने देवधर आणि मुळीक यांचं तिकीट कापत मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे.
भाजपकडून नारी शक्तीचा सन्मान! लोकसभेच्या 20 उमेदवारांमध्ये पाच महिलांना दिलं स्थान
भाजकडून दुसऱ्यांदा संधी नाहीच-
प्रदीप रावत, अनिल शिरोळे, गिरीश बापट यांनी भाजपचे लोकसभा खासदार म्हणून पुण्यात काम केलं. मात्र, पुण्यात भाजपने आपल्या खासदारांना पुन्हा संधी दिली नहाी. शिवाय, साधारणत: एका वर्षापूर्वी बापट यांचं निधन झाल्यानं भापज नव्या उमदेवारांच्या शोधात होता. महापौर पदाची मोहोळ यांची कारकीर्द पाहता त्यांनाच तिकीट मिळेल, अशी शक्यता होती. 2017 मध्ये भाजप पहिल्यांदा स्वबळावर पुणे महापालिकेत सत्तेवर आली होती. तेव्हा स्थायी समितीचं अध्यक्षपद मोहोळ यांच्याकडे होत. त्यानंतर त्यांना महापौरपदी संधी मिळाली. त्याच काळात कोरोना आला. मात्र, मोहोळ यांनी कोरोना काळात केलेलं काम राज्याच्या भाजप नेतृत्वाला भावलं. त्यामुळं भाजप नेतृत्वाने मोहोळ यांच्या नावाची लोकसभेसाठी शिफारल केली असण्याची शक्यता आहे.
फडणवीस यांचे निकटवर्तीय
मोहोळ महापौर असतांनाच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचं उद्घाटन झालं. सातत्याने ते विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून ते लोकांसमोर येत राहिले. तेव्हा पासून ते लोकसभेचे उमेदवारी असतील अशी चर्चा सुरू होती. दुसरं असं की, मोहोळ हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांचे पक्षातील निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. इतर पक्षांच्या नेत्यांशीही त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे मोहोळ यांना उमेदवारी मिळेल, असा अंदाज वर्तवला जात होता आणि तसचं झालं.
मोहोळ हे पाटील यांच्यासाठी अडसर ठरले असते…
काही दिवसांपूर्वी मेधा कुलकर्णी यांची राज्यसभेवर निवडण झाली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच तिकीट कापण्यात आलं होतं. त्यांच्याऐवजी चंद्रकांत पाटील यांना कोथरूडमधून उमेदवारी मिळाली होती. खरंतर कुलकर्णी ह्या ब्राम्हण आहेत. कोथरूडमध्ये ब्राम्हण मतदारांचं प्राबल्य आहे. असं असतांनाही कुलकर्णी यांना 2019 मध्ये उमेदवारी नाकराली गेले. त्यामुळं भाजपने ब्राम्हण उमेदवाराला डावलंलं, असा मेसेज गेला. त्यामुळं आता मेधा कुलकर्णांना राज्यसभेवर निवडलं. त्यामुळं विधानसभेसाठी चंद्रकांत पाटील यांनाच कोथरूडमधून उमेदवारी मिळणार हे स्पष्ट आहे. मात्र,मोहोळ पाटील यांच्यासाठी अडसर ठरले असते. मोहोळ यांनी यांनी कोथरूड मतदारसंघावर दावा ठोकला असता. त्यामुळं भाजपने मुळीक यांनी केंद्रात पाठण्याचा निर्णय घेतला.
ब्राह्मणेतर उमेदवार म्हणून मोहोळ यांना संधी
सुनील देवधर यांना पुण्यातून तिकीट मिळण्याची शक्यता जास्त होती. मात्र, कसबा पोटनिवडणुकीत भाजपचा मोठा पराभव झाला होता. त्यामुळे भाजपने लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ यांच्या रूपाने मराठा चेहरा मैदानात उतरला. काँग्रेसकडून ब्राह्मणेतर उमेदवार उभे करण्याची तयारी असल्यानं भाजपनेही ब्राह्मणेतर उमेदवार म्हणून मोहोळ यांना संधी दिली.