‘जनतेच्या विश्वासाची पावतीच’; उमेदवारी मिळताच भारती पवारांची पहिली प्रतिक्रिया

‘जनतेच्या विश्वासाची पावतीच’; उमेदवारी मिळताच भारती पवारांची पहिली प्रतिक्रिया

Bharti Pawar News : मागील पाच वर्षांतील जनतेच्या विश्वासाची पावतीच मिळाली असल्याची पहिली प्रतिक्रिया भाजपच्या खासदार भारती पवार (Bharti Pawar) यांनी उमेदवारी जाहीर होताच दिली आहे. दरम्यान, भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये भाजपने अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली असून सलग दुसऱ्यांदाही भारती पवार यांना उमेदवारी दिली आहे.

CM शिंदेंनी शिवतारेंना आवरावं, अन्यथा औकात दाखवू…; अमोल मिटकरींचा हल्लाबोल

भारती पवार म्हणाल्या, भाजपकडून मला उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल पक्षाचे नेते जे, पी नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाहा यांच्यासह महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांची मी आभआरी असून वरिष्ठ नेत्यांकडून नेहमीच आम्हाला मार्गदर्शन लाभलं आहे. माझ्या मतदारसंघातून पहिली महिला खासदार म्हणून जनतेने पहिल्यांदा आशिर्वाद दिले आता दुसऱ्यांदाही देणार असल्याचा विश्वासही भारती पवार यांनी व्यक्त केला आहे.

Supreme Court च्या आदेशानंतर अखेर स्टेट बँकेने निवडणूक आयोगाला पाठवला इलेक्ट्रोल बॉन्ड्सचा तपशील

तसेच आता जनेतेने ठरवलं की ‘अबकी बार मोदी सरकार’ ‘फिरसे मोदी सरकार चारसो’पार असा नारा देत भारती पवार यांनी देशाला पुढे न्यायचं असेल तर पुन्हा देशाला मोदींचीच गरज असून मोदीचं नेतृत्व देशाच्या सुरक्षेसाठी हवं असल्याचं स्पष्ट केलं आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने दुसरी यादी जाहीर केली असून, दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील मोठ्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, बीडमधून पंकजा मुंडे, रावेरमधून रक्षा खडसे, नंदुरबारमधून हिना गावित, धुळे सुभाष भामरे, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहेत. तर, पुण्यातून माजी महापौर मुरलीधर मोहोळ बीडमधून पंकजा मुंडे आणि नागपूरमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना तर, अहमदनगरमधून सुजय विखे पाटील यांना तिकीट जाहीर करण्यात आले आहे.

दरम्यान, आत्तापर्यंत भाजपकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून एकूण 20 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे.या दुसऱ्या यादीत देशभरातील एकूण 90 उमेदवारांची नावे भाजपने जाहीर केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज