भाजपकडून नारी शक्तीचा सन्मान! लोकसभेच्या 20 उमेदवारांमध्ये पाच महिलांना दिलं स्थान
BJP Candidate List : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) पार्श्वभूमीवर भाजपने (BJP) आज लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील २० जागांवर भाजपने उमेदवारी जाहीर केली. त्यातील पाच जागांवर भाजपने महिला उमदेवारांना संधी दिली.
Anup Dhotre : भाजपने अकोल्यातून लोकसभेसाठी रिंगणात उतरवलेले अनुप धोत्रे आहेत तरी कोण?
गेल्या काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीसाठी पंकजा मुंडे यांना उमदेवारी मिळणार अशी चर्चा सुरू होती. पंकजा यांना अनेकदा आपण लोकसभेसाठी इच्छुक असल्याचं बोलून दाखवलं होतं. मागील काही दिवसांपासून त्यांना कार्यक्रमांचा धडाकाच लावला होता. अखेर त्यांना बीडमधून लोकसभेची उमदेवारी जाहीर झाली आहे. भाजपने बीड लोकसभा मतदारसंघातून प्रीतम मुंडे यांची उमेदवारी नाकारत त्यांच्या जागी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली.
Murlidhar Mohol : कसलेला पैलवान, महापौर अन् आता खासदारकीचा उमेदवार…
2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने जळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बदलला होता. नाना पाटील यांच्या जागी उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर आगामी लोकसभा निवडमुकीसाठी उन्मेष पाटील यांच्या जागी स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
तर नंदुरबार मधुन डॉ. हिना गावित यांना उमदेवारी जाहीर झाली आहेत. रावेरमधून रक्षा निखिल खडसे, आणि दिंडोरमधून भारती पवार यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे.
नागपुरातून नितीन गडकरींना उमेदवारी
नागपुरातून नितीन गडकरी यांच्या उमेदवारी जाहीर झाली आहे. मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून गोपाळ शेट्टी यांच्या जागी पियुष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर उत्तर पूर्व मुंबईतून मनोज कोटक यांच्या जागी मिहिर कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उन्मेष पाटील यांच्या जागी स्मिता वाघ यांना जळगावमधून उमेदवारी देण्यात आली आहे.