Anup Dhotre : भाजपने अकोल्यातून लोकसभेसाठी रिंगणात उतरवलेले अनुप धोत्रे आहेत तरी कोण?
BJP Candidate List : लोकसभा निवडणुक (Lok Sabha Elections) जाहीर होण्यास अवघे काही दिवस उरले असतांना भाजपकडून (BJP) उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत महाराष्ट्रातील 20 जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. प्रकृतीच्या कारणास्तव अकोला लोकसभा मतदारसंघातून संजय धोत्रे (Sanjay Dhotre) यांचे तिकीट रद्द करण्यात आले असून, त्या ठिकाणी अनुप धोत्रे (Anup Dhotre) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, अनुप धोत्रे आहेत तरी कोण, याच विषयी जाणून घेऊ.
भाजपकडून गेम; डेलकरांना उमेदवारी देऊन ठाकरेंना झटकाच दिला…
अनुप धोत्रे यांचा जन्म २४ मे १९८४ रोजी झाला. पुण्याच्या सिम्बायोसिस कॉलेजमधून त्यांनी बी.कॉमचे शिक्षण घेतले आहे. अनुप यांना मोठा राजकीय वारसा आहे. अनुप यांचे आजोबा श्यामराव धोत्रे हे आमदार होते. तर त्यांचे वडील संजय धोत्रे खासदार होते. संजय धोत्रे हे अकोला लोकसभा मतदारसंघातून सलग चार वेळा विजयी झाले आहेत. मात्र आता प्रकृतीच्या कारणामुळे ते 2024 ची निवडणूक लढवणार नाहीत. त्यामुळं भाजपने अनुप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर केली. अनुप यांच्या आई सुहासिनी धोत्रे या भाजप महिला आघाडीच्या पदाधिकारी आहेत.
पंकजा मुंडे यांना तब्बल साडेचार वर्षांनंतर संधी… फडणवीस यांचे टेन्शन गेले!
अनुप धोत्रे हे राजकारणाव्यतिरिक्त उद्योग क्षेत्रातही सक्रीय आहेत. त्यांचा अकोला औद्योगिक वसाहतीत उद्योग समूह आहे. यामध्ये अनुप इंजिनिअरिंग वर्क्स, सोनल इंजिनिअरिंग वर्क्स, नकुल इंडस्ट्रीज, स्प्रिंकलर सेट्स, एचडीपीई पाईप्स मॅन्युफॅक्चरिंग, प्लॅस्टिकसाठी रेपोल, थर्मल पॉवर प्लांट्ससाठी जॉब वर्क, फूड प्रोसेसिंग युनिट्स आदी उद्योग आहेत.
अनुप हे ग्वाल्हेरमधील जीआयसीटीएस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे सचिव आहेत आणि त्याद्वारे त्यांनी शेतकऱ्यांसाठी काम केले आहे. याशिवया, ते अभिनव बाल शिक्षा प्रशिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष आहेत. ते अकोल्यातील नीलकंठ सहकारी सूतगिरणीचे संचालक आहेत.