पुणे शहरातील तीन विद्यमानांना पुन्हा संधी तर तीन जागांवर सस्पेन्स कायम…
पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून (BJP) आज 99 उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये पुणे शहरातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी तीन मतदार संघातील उमेदवारांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.
ज्योती मेटेंचा शरद पवार गटात प्रवेश, राष्ट्रवादीकडून बीड विधानसभा लढणार?
पुणे शहरातील कोथरूड, पर्वती आणि शिवाजीनगर या विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार अनुक्रमे चंद्रकांत पाटील, (Chandrakant Patil) माधुरी मिसाळ आणि सिद्धार्थ शिरोळे यांना पुन्हा भाजपकडून संधी देण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टी केंद्रीय निवडणूक समितीची बैठक 16 ऑक्टोबरला जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय निवडणूक समितीचे इतर सदस्य या बैठकीत उपस्थित होते. या बैठकीत आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी केंद्रीय निवडणूक समितीने 99 उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यामध्ये पुण्यातील तीन उमेदवारांचा समावेश आहे.
कोथरूडमधून चंद्रकात पाटील मैदानात…
पुणे शहरातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील हे दुसऱ्यांदा निवडणूक लढणार आहेत. कोथरूड मधून भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. तशी मागणीही त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या कानावर दोन दिवसापूर्वी घातली होती.मात्र त्यानंतर भाजपकडून उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात आली असून यामध्ये पुन्हा एकदा पाटलांना संधी देण्यात आल्याने अमोल बालवडेकर यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागल आहे.
Parner Vidhansabha : आदित्य ठाकरेंच्या भेटीनंतर पठारे विधानसभेच्या तयारीला…
पर्वती विधानसभा मतदारसंघात तीन टर्म आमदार राहिलेल्या माधुरी मिसाळ यांना भाजपकडून चौथ्यांदा संधी देण्यात आली आहे. पर्वती मतदारसंघात देखील भाजपचे माजी नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र त्यांना आचारसंहितेपूर्वी महामंडळ देऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ते काय भूमिका घेतात हे देखील पाहणं भाजपच्या दृष्टीने महत्त्वाच असणार आहे. तर शिवाजीनगर मतदार संघात सिद्धार्थ शिरोळ यांना पुन्हा एकदा पक्षाने संधी देऊन त्यांच्यावर विश्वास टाकला आहे.
दरम्यान, पुणे शहरातील भाजपच्या वाट्याला येणाऱ्या कसबा पेठ, पुणे कॅन्टोन्मेंट, खडकवासला या विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी घोषित न झाल्याने येथील सस्पेन्स मात्र कायम आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघातून हेमंत रासने इच्छुक आहेत. मात्र येथून ब्राह्मण उमेदवार द्यावा, अशी मागणी करणारा एक गट आहे. येथून भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे देखील इच्छुक असल्याने कुणाला संधी मिळते हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. तर पुणे कॅन्टोन्मेंट मध्ये विद्यमान आमदार सुनील कांबळे यांना संधी मिळते का? त्याचप्रमाणे कोथरूडप्रमाणेच भाजपची मोठी ताकद असलेला खडकवासला या मतदारसंघात भीमराव तापकीर यांना पुन्हा संधी मिळणार का याकडे देखील लक्ष लागलं आहे.
दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप खासदार मुरलीधर मोहोळ यांनी विजय मिळवला होता. मात्र पुणे शहरातील या सहा विधानसभा मतदारसंघातून म्हणावं तसं मताधिक्य मिळालं नव्हतं. यामुळे विधानसभा निवडणुकीत खांदेपालट होणार का? यावर बऱ्याच चर्चा झाल्या. मात्र तीन जागांवर तरी विद्यमानांनाच संधी दिल्याने उर्वरित तीन जागी भाजप पक्षश्रेष्ठी कोणाला धक्का देणार आणि कुणाला संधी? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.