भाजपकडून गेम; डेलकरांना उमेदवारी देऊन ठाकरेंना झटकाच दिला…

भाजपकडून गेम; डेलकरांना उमेदवारी देऊन ठाकरेंना झटकाच दिला…

Loksabha 2024 BJP List : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) भाजपकडून उमेदवारांची दुसरी यादी नूकतीच जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये पहिल्याचं नंबरवर उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांच्या हक्काचा उमेदवार कलाबेन डेलकर यांचं नाव आहे. कलाबेन डेलकर (Kalaben Delkar) यांनीही शिवसेनेत फुट पडल्यानंतर ठाकरे कुटुंबियांची साथ सोडली. भाजपच्या दुसऱ्या यादीत दादर नगर हवेली लोकसभा मतदारसंघातून कलाबेन डेलकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे भाजपने उद्धव ठाकरेंचा मोठा गेमच करुन झटकाच दिला असल्याचं बोललं जात आहे.

मुख्यमंत्रिपदानंतर आता आमदारकीचाही राजीनामा, मनोहर लाल खट्टर यांची पुढची खेळी काय?

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना कलाबेन डेलकर यांचे पती मोहन डेलकर हे भाजपचे खासदार होते. दादर नगर हवेली मतदारसंघातून ते सलग 7 वेळा लोकसभेत गेले आहेत. मात्र, 22 फेब्रुवारी 2021 रोजी त्यांनी मुंबईतील एका नामंकित हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याचं समोर आलं.

‘भारत जोडो न्याय’ यात्रेची महाराष्ट्रात एन्ट्री; डाव जिंकण्यासाठी राहुल गांधींनी बाहेर काढलं आदिवासी कार्ड

डेलकर यांच्या हत्येनंतर अनेक आरोप-प्रत्यारोप झाल्याचं दिसून आलं होतं. त्यानंतर पोटनिवडणूक लागली आणि कलाबेन डेलकर यांना उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची उमेदवारी दिली होती. या पोटनिवडणुकीत कलाबेन डेलकर निवडून आल्या होत्या.

दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजनेचा लाभ कोणाला अन् कसा मिळणार?

दरम्यान, पोटनिवडणुकीत ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते संजय राऊत, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी कलाबेन डेलकर यांच्या निवडणुकीचा प्रचार केला होता. या निवडणुकीमध्ये कलाबेन डेलकर यांनी विजय मिळवत महाराष्ट्राबाहेर निवडून येणाऱ्या पहिल्या शिवसेना खासदार ठरल्या होत्या.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube