तब्बल तेरा वर्षानी ट्रेंड सेटर गायक अभिजीत सावंतने केलं ‘या’ मराठी चित्रपटासाठी खास गाणं !
Abhijeet Sawant : 2025 वर्षात ट्रेंड सेटर ठरलेला गायक अभिजीत सावंत आता पुन्हा एकदा प्रेक्षकांचं सुरले अंदाजात मनोरंजन करण्यासाठी सज्ज होताना
Abhijeet Sawant : 2025 वर्षात ट्रेंड सेटर ठरलेला गायक अभिजीत सावंत आता पुन्हा एकदा प्रेक्षकांचं सुरले अंदाजात मनोरंजन करण्यासाठी सज्ज होताना बघायला मिळणार आहे. अगदी इंडियन आयडॉल ते ट्रेंड सेटर गायक म्हणून असलेली त्याची ओळख कायम प्रेक्षकांना काहीतरी नवीन गाणं देऊन जाते.
तब्बल 13 वर्षानी पुन्हा एकदा अभिजीत ” सखे गं साजणी ” या मराठी चित्रपटाच टायटल ट्रॅक त्याने केलं आहे. सर सुखाची श्रावणी या सदाबहार गाण्यानंतर तो आता पुन्हा प्रेक्षकांचं मनोरंजन चित्रपटाच्या गाण्यातून करणार आहे. या गाण्यात अभिजीतची एक झलक देखील बघायला मिळतेय.
नुकतंच सखे गं साजणी हे गाणं प्रदर्शित झाल असून अभिजीत या गाण्याबद्दल सांगताना म्हणतो “चित्रपटासाठी गाणं करणं हे प्रत्येक गायकांच स्वप्नं असतं आणि अश्यातच ही संधी मला मिळाली याचा खूप आनंद आहे. “सखे गं साजणी” चित्रपटाचं टायटल ट्रॅक करायचं आहे हे समजलं तेव्हा पासून या गाण्याबद्दल मला सुद्धा उत्सुकता होती.
उन्हाळ्याच्या सुट्टीत पुरेपूर मनोरंजन करणारा “पिक्चर बॉईज”; ‘या’ दिवशी होणार रिलीज
View this post on Instagram
गाणं गाऊन अभिनय करणं या दोन्ही गोष्टी या गाण्यात करायला मिळाल्या आहेत त्यामुळे हे गाणं अजून खास झालं आहे. प्रेक्षकांनी आजवर माझ्या प्रत्येक कलाकृतीला भरभरून प्रेम दिलं तेवढंच प्रेम प्रेक्षक या गाण्यासाठी देखील देतील अशी आशा आहे” “चाल तुरू तुरू , रुपेरी वाळूत आणि अश्या गाण्यांमधून अभिजीतच्या आवाजाची जादू प्रेक्षकांना अनुभवली आहे आता या नव्या गाण्याने देखील प्रेक्षक पुन्हा एकदा मंत्रमुग्ध होतील यात शंका नाही.
