तब्बल 20 वर्षांनी इंडियन आयडॉलचा मंच गाजवण्यासाठी ट्रेंड सेटर गायक अभिजीत सावंत सज्ज!

Abhijeet Sawant Indian Idol Legends Return: गायक अभिजीत सावंत पुन्हा एकदा “इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न” मधून हा मंच गाजवण्यासाठी सज्ज झाला.

Abhijeet Sawant Indian Idol Legends Return

Abhijeet Sawant Indian Idol Legends Return: ज्याने 20 वर्षापूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात पोहचला असा गायक अभिजीत सावंत पुन्हा एकदा “इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न” मधून हा मंच गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या 17 ऑक्टोबर पासून इंडियन आयडॉल रिटर्न्स सोनी टीव्हीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Imran Khan Notice : इम्रान खानला देश सोडण्याची नोटीस, OCI कार्डधारकाला भारतात आंदोलन करता येतं का?

इंडियन आयडॉल पासून अभिजीतच्या सांगीतिक प्रवासाची सुरुवात झाली आणि आज हा प्रवास पुन्हा एकदा त्याचा पहिल्या प्रवासाची आठवण करून देत जुन्या आठवणीना नव्या रुपात सादर करण्यासाठी अभिजीत या शो मध्ये दिसणार आहे. “इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न” मध्ये त्याच्या सोबतीने प्राजक्ता शुक्रे आणि बाकी गायक मंडळी सुद्धा दिसणार असल्याचं कळतंय.

अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’चा आंतरराष्ट्रीय डंका; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरलं नाव

नव्या प्रोमोमध्ये अभिजीतच्या पहिल्या परफॉर्मन्स पासून सुरू झालेला एक सुवर्ण प्रवासाची झलक देतो तर दुसरीकडे हिमेश रेशमियानेही अभिजीतच कौतुक केलं आहे. संगीताच्या तालावर अभिजीतची एंट्री करत त्याने हे पुनरागमन शोला ब्लॉकबस्टर बनवेल, असं म्हटलं असून अभिजीतने ‘इंडियन आयडॉल’प्रती असलेलं आपलं ऋण फेडलं असून, संगीतविश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, असंही हिमेशने सांगितलं.

सोहळा : बालपणाच्या उंबरठ्यावरच्या भावविश्वाचा हळवा अन् देखणा प्रवास!

अभिजीत “इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न” बद्दल बोलताना सांगतो, खरंतर या मंचावर उभं राहून गाण्यात एक वेगळीच ऊर्जा आणि उत्साह आहे. ज्या मंचाने मला ओळख दिली, आज पुन्हा त्याच मंचावर माझ्या जुन्या सह गायक मित्रासोबत हा अनुभव घेता येतो याचं समाधान आहे. “इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न” मध्ये येणं हे अगदीच घरी परतून येण्यासारख आहे, असं मला वाटतं. प्रेक्षकांनी 20 वर्षापूर्वी जे प्रेम दिलं होत त्याहून जास्त प्रेम ते यावेळी देतील यात शंका नाही”

येणाऱ्या काळात अभिजीत अजून नवनवीन प्रोजेक्ट्सचा भाग देखील होणार असल्याचं कळतंय तर “इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न” हा शो येत्या 17 ऑक्टोबर 2026 पासून सोनी टीव्हीवर प्रसारित होणार आहे.

follow us