मुख्यमंत्रिपदानंतर आता आमदारकीचाही राजीनामा, मनोहर लाल खट्टर यांची पुढची खेळी काय?

मुख्यमंत्रिपदानंतर आता आमदारकीचाही राजीनामा, मनोहर लाल खट्टर यांची पुढची खेळी काय?

Manohar Lal Khattar resign MLA : लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) तोंडावर असतांनाच काल हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्ट (Manohar Lal Khattar) यांनी आपला राजीनामा दिला. त्यानंतर आज (१३ मार्च) आपण विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याची घोषणा खट्टर यांनी विधानसभेत केली.

पोलीस पाटील आशासेविकांच्या मानधनात मोठी वाढ, राज्य सरकारचा मोठा निर्णय 

मुख्यमंत्रीपदाचा दिल्यानंतर आज मनोहर लाल खट्टर यांनी आपल्या आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. खट्टर हे हरियाणाच्या कर्नाल विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. आमदारकीचा राजीनामा देतांना खट्टर म्हणाले की,
खट्टर म्हणाले की, मी आज जाहीर करतो की, मी कर्नाल विधानसभेच्या आमदार पदाचा राजीनामा देत आहे. आजपासून आमचे नायब सिंग सैनी कर्नाल विधानसभेची जबाबदारी स्वीकारतील. यापुढं माझ्यावर दिली जाणारी जबाबदारी मी पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहीन, असं ते म्हणाले.

अहमदनगर नव्हे तर आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर; शिंदे सरकारचा निर्णय 

हरियाणात भारतीय जनता पक्ष आणि जननायक जनता पक्षाची युती अखेर मंगळवारी (१२ मार्च) रोजी तुटली. मनोहर लाल खट्टर यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानंतर नायबसिंग सैनी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सैनी यांच्यासोबत भाजप नेते कंवर पाल गुजर, भाजप नेते मूलचंद शर्मा, जय प्रकाश दलाल, बनवारी लाल तसेच अपक्ष आमदार रणजित सिंह यांनीही हरियाणा मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेतली होती.

दरम्यान, नायब सिंग सैनी हे कुरुक्षेत्र मतदारसंघातून खासदार होते. काल त्यांनी सीएम पदाची शपथ घेतल्यानं त्यांना पुढील सहा महिन्यांत कोणत्याही पोटनिवडणुकीतून विधानसभेचे सदस्य होणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत ते कर्नाल विधानसभेच्या रिक्त जागेवरून निवडणूक लढवू शकतात.

लोकसभा निवडणूक लढवणार का?

सैनी हे कर्नाल मधून आमदारकीची पोटनिवडणूक लढवतील. तर भाजप खट्टर यांना कर्नाल लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देऊ शकते, अशी चर्चा हरियाणाच्या राजकीय वर्तुळात आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज