निवडणुकीनंतर काँग्रेस ॲक्शन मोडमध्ये, माजी आमदारासह 5 नेत्यांची पक्षातून हकालपट्टी

Haryana Congress : विधानसभा निवडणुकीनंतर हरियाणा काँग्रेस पक्षाने (Haryana Congress) मोठा निर्णय घेत माजी आमदारासह पाच नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षाने या नेत्यांना 6 वर्षांसाठी बाहेरचा रस्ता दाखवला आहे. सध्या हरियाणात नागरी संस्थांच्या निवडणुकांमुळे राजकीय हालचाली जोरात सुरू आहेत.
या निवडणुकीत राजकीय पक्षांनी आपली सर्व ताकद पणाला लावली आहे. या निवडणुकीत पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याबद्दल हरियाणा काँग्रेसने माजी आमदारासह 5 नेत्यांना 6 वर्षांसाठी पक्षातून काढून टाकले. काँग्रेस पक्षातून काढून टाकण्यात आलेल्या नेत्यांमध्ये पतौडीचे माजी आमदार रामबीर सिंग (Rambir Singh) यांचा समावेश आहे.
हरियाणा काँग्रेसने रामबीर सिंग यांना 6 वर्षांसाठी पक्षातून काढून टाकले. त्यांच्यासोबत फरिदाबाद येथील विजय कौशिक, फरिदाबाद वॉर्ड क्रमांक 26 मधील राहुल चौधरी, फरिदाबाद वॉर्ड क्रमांक 39 मधील पूजा राणी आणि त्यांचे पती रूपेश मलिक यांनाही बाहेर काढण्यात आले आहे.
Haryana Congress expels its five leaders for six years for indulging in anti-party activities pic.twitter.com/yi5lI4Ni0W
— ANI (@ANI) February 27, 2025
जीवन विमा पॉलिसी खरेदीदारांनो सावधान, दाव्याच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असणाऱ्या नेत्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले होते तसेच काँग्रेस हायकमांड देखील आता अनेक नेत्यांवर कारवाई करणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.
प्रदेशाध्यक्ष बदलण्याबाबतही चर्चा
प्रदेश काँग्रेस अध्यक्ष बदलण्याचीही चर्चा आहे. अलिकडेच पक्षाने काही राज्यांमध्ये अध्यक्ष बदलले आहेत. हरियाणात प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते हे जातीय समीकरणे लक्षात घेऊन ठरवले जातील. आतापर्यंत पक्ष दलित-जाट समीकरण तयार करत आहे. म्हणजेच, प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेत्यांमध्ये एक दलित नेता आहे आणि दुसरा जाट असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.