अहमदनगर नव्हे तर आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर; शिंदे सरकारचा निर्णय

अहमदनगर नव्हे तर आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर; शिंदे सरकारचा निर्णय

Ahmednagar News : मागील काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी अहमदनगरच्या नामांतराबाबत (Ahmednagar change of name) मोठी घोषणा केली होती. अहमदनगरचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी (Ahilyadevinagar) असं करण्यात यावं, अशी मागणी सातत्याने केली जात होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात अहिल्यादेवीनगरची घोषणा केली होती. त्यानंतर नामांतराला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली आहे.

अहमदनगर शहराचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. या निर्णयानंतर अहमदनगरमधील नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे. शिंदे सरकारचा हा निर्णय पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारा, त्यांचे विचार, कार्य, स्मृती पुढे घेऊन जाणारा, लोकप्रतिनिधींना चांगले कार्य करण्यासाठी प्रेरणा देणारा आहे.

“भाजपात जाण्याची इच्छा नाही, गेलोच तर शरद पवारांना कळवीन”; नाथाभाऊंचं मोठं वक्तव्य

या निर्णयामुळे अहमदनगर शहरवासियांची जिल्हावासियांची, महाराष्ट्रातील तेरा कोटी नागरिकांची महत्वाची इच्छा पूर्ण झाली असून हा निर्णय होण्यात आमदार संग्राम जगताप, दत्तामामा भरणे आशुतोष काळे, नितीन पवार या लोकप्रतिनिधींनी महत्वाची भूमिका बजावली आहे. आमदार जगताप यांच्यासह, भरणे यांनी अहमदनगरच्या नामांतराबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती. त्यानंतर तत्काळ आज राज्य मंत्रिमंडळाकडून निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयाचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहमदनगर शहराचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले असून मुख्यमंत्री तसेच राज्य मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज