“भाजपात जाण्याची इच्छा नाही, गेलोच तर शरद पवारांना कळवीन”; नाथाभाऊंचं मोठं वक्तव्य

“भाजपात जाण्याची इच्छा नाही, गेलोच तर शरद पवारांना कळवीन”; नाथाभाऊंचं मोठं वक्तव्य

Eknath Khadse : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) भाजपमध्ये जाण्याच्या अधूनमधन होत असतात. आता लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election) जवळ आल्याने या चर्चांनी वेग घेतला आहे. त्यामुळे या चर्चांवर आता खु्द्द एकनाथ खडसे यांनीच मौन सोडले आहे. भाजपमध्ये जाण्याचं कोणतंच मोठं कारण सध्या दिसत नाही. भाजपात परत जाण्याची माझी इच्छाही नाही. परंतु, केव्हाही जाईन त्यावेळी शरद पवार (Sharad Pawar) यांनी कळवेन. शरद पवार यांच्या संमतीने जाईन. मी लपूनछपून जाणार नाही. ज्यावेळी जाईन तेव्हा उघडपणे जाईन, असे खडसे म्हणाले.

खडसे पुढे म्हणाले, मला जर खरच भाजपात जायचं असेल तर यांच्या (गिरीश महाजन) परवानगीची गरज मला नाही. मी 40 ते 42 वर्षे भाजपात होतो. त्यामुळे वरिष्ठांशी माझे चांगले संबंध आहेत. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना मी कधीच भेटलो नाही. रक्षाताई भाजपाच्या खासदार आहेत. त्यामुळे भाजप नेत्यांशी भेटीगाठी होत असतात, असेही खडसे म्हणाले.

Eknath Khadase : …तोपर्यंत अजित पवार संघाला समर्थन देणार नाही; खडसेंचा अजितदादांवर ठाम विश्वास

शरद पवार यांनी अशा काळात मला आमदारकी मिळवून दिली त्यावेळी मी अंधारात होतो. आजपर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय मी कोणतीही गोष्ट केलेली नाही. भाजप नेत्यांबरोबर आजही माझे संबंध आहेत. हे मी कधी लपवून ठेवलेलं नाही. शरद पवार यांना सुद्धा हे माहिती आहे, असे खडसे म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पुन्हा भाजपात परतण्याची तयारी करत आहेत. दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी त्यांची चर्चा सुरू आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी अजून ग्रीन सिग्नल दिलेला नाही. त्यामुळे खडसेंचा पक्षप्रवेश रखडल्याची चर्चा आहे. मागील काही दिवसांपासून खडसे राज्याच्या राजकारणातून गायब झाले आहेत. आधीप्रमाणे पक्षाची बाजू आक्रमकपणे मांडतानाही ते दिसत नाहीत. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा निर्णय अजित पवार यांच्या बाजूने दिल्यापासून खडसे राजकारणातून गायब झाल्याचे दिसत आहे.

Jayant Patil : एकनाथ खडसेंची लोकसभेतून माघार! जयंत पाटलांनी कारणही दिले

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज