Sharad Pawar : “अमित शाहांनी मान्य केलं, मी त्यांचा आभारी”; शरद पवारांचं खोचक प्रत्युत्तर
Sharad Pawar replies Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रात आले होते. जळगाव येथील जाहीर सभेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. “महाराष्ट्राची जनता गेल्या 50 वर्षांपासून शरद पवारांना सहन करतेय” अशी टीका अमित शाह यांनी केली होती. त्यांच्या याच टीकेला आज शरद पवार यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले. खासदार शरद पवार यांची आज मावळमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत शरद पवार विरोधकांवर तुटून पडले. तसेच अमित शाह यांनाही जोरदार प्रत्युत्तर दिले.
‘केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात आले होते. याठिकाणी भाषण करताना त्यांनी म्हटलं की, ५० वर्षे शरद पवार महाराष्ट्रावर बसले आहेत. मी त्यांचा आभारी आहे, कारण मला ५० वर्षे लोकांनी निवडून दिलं हे त्यांनी मान्य केलं, असे शरद पवार म्हणाले. पहिल्यांदा आमदार, नंतर खासदार, नंतर मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्यसभा हा सगळा काळ 56 वर्षांचा आहे. देशाच्या संसदेत एक माणूस सतत 56 वर्षे लोकांच्या संपर्कात आहे. कारण मला तुमची साथ आहे, असेही शरद पवार म्हणाले.
Sharad Pawar : ‘युवकांच्या रोजगाराबाबतीत आम्ही तुमच्यासोबत’; शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना शब्द
या भाषणात शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. नरेंद्र मोदींचे भाषण पहा. काल ते बंगालमध्ये होते. तिथे ममता बॅनर्जींबाबत बोलले. ममता बॅनर्जी आणि मी आम्ही एकत्र काम केलं आहे. मी त्यांच्या घरीही गेलो आहे. त्यांचं घर अगदी लहान आहे. अशा वाघिणीवर जनता विश्वास ठेवत आली आहे. पण, मोदी त्यांच्याबाबत बोलले. हे कायद्याच्या चौकटीत बसत नाही, मोदींना हे शोभत नाही, असे शरद पवार म्हणाले.
आज पंतप्रधान पानभर जाहिराती देतात. मोदींची गॅरंटी देतात. पण ही जाहिरात कुणाच्या पैशाने दिली जात आहे. तर जनतेच्याच पैशाने दिली जात आहे. मोदी मागील दहा वर्षांपासून सत्तेत आहेत. आज हे सांगतात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट वाढवतो, उत्पन्न वाढलं का उलट शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. आत्महत्या करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आणली हीच मोदींनी गॅरंटी दिली अशी टीका शरद पवार यांनी केली.
Sharad Pawar : मनोज जरांगेंना बीड लोकसभेचं तिकीट देणार का? शरद पवार म्हणाले, आमच्यावर