Sharad Pawar : “युवकांच्या रोजगाराबाबतीत आम्ही तुमच्यासोबत”; शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना शब्द

Sharad Pawar : “युवकांच्या रोजगाराबाबतीत आम्ही तुमच्यासोबत”; शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना शब्द

Sharad Pawar Speech in Baramati : राज्य सरकारतर्फे नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन बारामती शहरात (Baramati) करण्यात आले होते. या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात रोजगाराच्या मुद्द्यावर राज्य सरकारला आमची साथ राहिल असं सांगितलं. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार अमोल कोल्हे, खासदार सुप्रिया सुळे आदी उपस्थित होते.

शरद पवार पुढे म्हणाले, राज्याची रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे. या मुद्द्यावर आमची सरकारला साथ असेल. विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक युवकांना रोजगार मिळाला. आज देशात बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे राज्य सरकारने रोजगार उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे. तरुणांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत त्यासाठी मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो, असे शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar : मनोज जरांगेंना बीड लोकसभेचं तिकीट देणार का? शरद पवार म्हणाले, आमच्यावर 

आता विद्या प्रतिष्ठानचे पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे महाविद्यालय सुरू होत आहे. राजकारण आपल्या जागी होत राहते. परंतु, युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. मी मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांना खात्री देऊ इच्छितो की विकासाच्याबाबतीत आम्ही नेहमीच तुमच्या पाठिशी राहू, असे शरद पवार म्हणाले. बारामतीमधील युवकांच्या हाताला काम देण्यासाठी सरकार जा काही पावले उचलेल त्यासाठी आमची मदत राहिल असेही शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

जर तुम्ही तरुणांच्या हाताला काम दिलं तर आम्ही तुमच्यासोबत राहू. ही खात्री मी तुम्हाला देतो. रोजगारासाठी सरकार पावलं टाकतंय ही चांगली गोष्ट आहे. राजकारण एका बाजूला असतं. मुलांच्या हाताला काम देण्यासाठी तुम्ही जे जे कराल त्यासाठी आम्ही तुमच्यासोबत राहू, एवढी खात्री मी तुम्हाला देतो, असे आश्वासन शरद पवार यांनी यावेळी दिले.

डिनर डिप्लोमसीवर शरद पवार ‘हिट विकेट’ CM शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आग्रहाचं निमंत्रण नाकारलं

दोन कोटी लाभार्थ्यांना फायदा : CM शिंदे 

शासन आपल्या दारी योजनेत लाभार्थ्यांना एका छताखाली योजनांचा लाभ दिला. 2 कोटी 7 लाख लोकांना लाभ दिला. सिलेक्शन झालेल्या उमेदवारांना थेट नियुक्ती देणारे हे पहिलं सरकार असेल हे मी अभिमानाने सांगतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज