Sharad Pawar : मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांच्या मनात शंका; म्हणाले, आरक्षणाचा प्रश्न सुटला तर..

Sharad Pawar : मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांच्या मनात शंका; म्हणाले, आरक्षणाचा प्रश्न सुटला तर..

Sharad Pawar on Maratha Reservation : राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात काल मराठा आरक्षण विधेयक (Maratha Reservation) एकमताने मंजूर करण्यात आले. या विधेयकावर राज्यपालांची सही झाल्यानंतर या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल. राज्य सरकारच्या या निर्णयावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही या मुद्द्यावर भाष्य केले आहे. मराठा आरक्षणाबाबत कायदेशीर सल्लागारांच्या मनात काही शंका आहेत. तशा माझ्याही मनात आहेत, असे विधान शरद पवार यांनी केले.

शरद पवार आज कोल्हापुरात आहेत. येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध मुद्द्यांवर मते व्यक्त केली. पत्रकारांनी त्यांना कालच्या मराठा आरक्षणाच्या निर्णयावर विचारले. कायदेशीर सल्लागार त्यांच्या मनात या आरक्षणाबाबत शंका आहेत. माझ्याही मनात याबाबत शंका आहे. हा प्रश्न सुटला तर मला आनंद आहे. पण, आता जे विधेयक मंजूर करण्यात आले आहे असेच विधेयक 2014 मध्ये मंजूर करण्यात आले होते.

Maratha Reservation : मराठ्यांचं आरक्षण कसं कमी झालं? फडणवीसांनी ‘स्टार्ट टू एन्ड’ सांगितलं

परंतु, हायकोर्टात टिकले नाही. पुढे देवेंद्र फडणवीस यांनी एक विधेयक मांडले. हे विधेयक उच्च न्यायालायात टिकले पण सर्वोच्च न्यायालयात नामंजूर करण्यात आले. आता सरकारने पुन्हा एक बिल मंजूर करून घेतले आहे. या निमित्ताने जर हा प्रश्न सुटत असेल तर चांगलच आहे. सर्वांनी एकमताने विधेयक मंजूर केले, असे शरद पवार म्हणाले. राज्य सरकारने मांडलेले विधेयक नेमके काय आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल काय आहे याचा अभ्यास करावा लागेल. त्यानंतरच या विषयावर काहीतरी बोलता येईल, असेही शरद पवार म्हणाले.

याआधी देवेंद्र फडणवीस यांनी अशाच पद्धतीने आरक्षण दिलं होतं. पण पुढं ते कोर्टात टिकलं नाही. आताही अशाच पद्धतीने आरक्षण मंजूर करून घेण्यात आले आहे. कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांच्या मते हे आरक्षण कोर्टात टिकेल असं वाटत नाही. असेच त्यांनी सांगितल्याचे शरद पवार म्हणाले. दरम्यान,  मराठा आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारन दिला असला तरी मनोज जरांगे पाटील यांना तो मान्य नाही. जरांगे पाटील आज पत्रकार परिषद घेऊन पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट करणार आहेत.

Maratha Reservation : शिंदे सरकारचं आरक्षण मंजूर नाही; जरांगेंनी इशारा देत पुन्हा उपसलं हत्यार

follow us
  • fb
  • instagram
  • youtube