Sharad Pawar : ईडीच्या कारवाईत एकही भाजपाचा नेता नाही; शरद पवारांनी थेट आकडेवारीच मांडली

शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? पवारांचं विधान अन् चर्चांना उधाण

Sharad Pawar : भाजपकडून आता सत्तेचा दुरुपयोग होत आहे. विरोधी पक्षातील नेत्यांवर ईडीच्या माध्यमातून कारवाई केली जात आहे. लोकांना अगोदर ईडी म्हणजे हे सुद्धा माहिती नव्हतं. पण, भारतीय जनता पार्टी सत्तेत आली आणि मागील आठ वर्षात 121 नेत्यांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये एक मुख्यमंत्री, एक माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षांच्या सरकारातील 14 मंत्री, 24 खासदार, 21 खासदार, 7 माजी खासदार यांचा समावेश आहे. 2005 ते 2023 या सतरा वर्षांच्या काळात ईडीच्या 6 हजार केसेस नोंदल्या गेल्या. त्यातील फक्त 25 निकाली निघाल्या आहेत आणि फक्त दोघांनाच शिक्षा झाली. ईडीने 85 टक्के विरोधी पक्षातील नेत्यांची चौकशी केली. विशेष म्हणजे, ईडीने कारवाई केलेल्या नेत्यांमध्ये एकही भाजपाचा नेता नाही, अशा शब्दांत खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकारवर हल्लाबोल केला.

Sharad Pawar : कायदा हातात घेणाऱ्यांना मोकळीक’ ‘गोळीबारा’च्या घटनेवर शरद पवारांचे सरकारला खडेबोल

शरद पवार आज पुण्यात होते. येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी भाजपावर घणाघाती टीका केली.  उत्तरेकडील राज्यात भाजपाची सत्ता आहे. मात्र, त्यांची धोरणं सामाजिक ऐक्याला धक्का देणारी आहेत. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत भाषण केलं. त्यावेळी त्यांनी इंदिरा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांच्यावर भाष्य केलं. नेहरुंवर व्यक्तिगत हल्ले मोदींनी केले. पण, अशाने काय होणार हेच मला समजत नाही. ज्यांनी देशाला दिशा दिली. देशासाठी कष्ट उपसले त्यांच्यावर व्यक्तिगत हल्ले करणं शहाणपणाचं लक्षण नाही, असे पवार म्हणाले.

मी काही निवडणुकीला उभा राहणार नाही. हे मी आधीच जाहीर केलं आहे त्यामुळे भावनिक बोलण्याचं काहीच कारण नाही. बारामतीची लोकं समंजस आहेत. शहाणी आहेत. वर्षानुवर्षे काम आणि त्याची प्रतिष्ठा वाढवली हे त्यांनी पाहिलं आहे त्यामुळे योग्य निर्णय ते घेतील, अशा शब्दांत शरद पवार यांनी अजित पवार यांना खोचक टोला लगावला.

Sharad Pawar : शरद पवार गटाचं पक्षचिन्ह अन् नाव ठरलं; ‘या’ नावांतून एक होणार फायनल

follow us