Sharad Pawar : शरद पवार गटाचं पक्षचिन्ह अन् नाव ठरलं; ‘या’ नावांतून एक होणार फायनल
Sharad Pawar : केंद्रीय निवडणूक आयोगाने काल (Election Commission) मोठा निर्णय देत राष्ट्रवादी पक्ष चिन्ह आणि नाव अजित पवार गटाला बहाल केलं. ऐन निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय आल्याने शरद पवार (Sharad Pawar) यांना जोरदार धक्का बसला. मात्र या धक्क्यातून सावरत शरद पवार गटाने पुढील कार्यवाहीस सुरूवात केली आहे. आज दुपारपर्यंत पक्षचिन्ह आणि नाव आयोगाला द्यावे लागणार आहे. आयोगाने शरद पवार सूचना दिल्या आहेत की ते त्यांचा नवा पक्ष स्थापन करण्यासाठी आयोगाला कोणतीही चार नावे देऊ शकतात. त्यासाठी आयोगाने दुपारी चार वाजेपर्यंत मुदत दिली आहे. अशा परिस्थितीत शरद पवार गटाकडून पक्षचिन्ह आणि नाव समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार गटाने पक्षासाठी ‘शरद पवार काँग्रेस’, ‘मी राष्ट्रवादी’ आणि ‘शरद पवार स्वाभिमानी पक्ष’ ही नावे देण्यात आली आहेत. तसेच चिन्हांसाठी ‘कपबशी’, ‘सूर्यफूल’, ‘चष्मा’ आणि ‘उगवता सूर्य’ ही चिन्हे देण्यात आली आहेत.
Sanjay Raut : निवडणूक आयोग मोदी-शहांच्या मालकीचा, त्यांनी शिवसेना-राष्ट्रवादीची.. राऊतांचा घणाघात
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय जाहीर केला आहे. शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिली आहे. निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला उद्या (7 फेब्रुवारी) चिन्हाबाबत माहिती देण्यास सांगितले आहे. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पक्ष आणि चिन्ह कोणाला मिळणार याची उत्सुकता सर्वाना होती. आता पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्याचे जाहीर झाले आहे. त्यामुळे शरद पवार गटाला आगामी निवडणुका वेगळ्या चिन्ह आणि नावाने लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
यालाच म्हणतात मोदी गॅरंटी : संजय राऊत
राष्ट्रवादीचा निकाल हा शिवसेनेसारखाच लागला. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. ते स्वतः आयोगासमोर येऊन बसले. तरीही आयोग पक्ष एका आयाराम गयाराम, ऐऱ्यागैऱ्याच्या हातात देतो. इतिहासात असा अन्याय कधी झाला नसेल. पक्षाचे संस्थापक समोर असताना जर आयोग संपूर्ण पक्षच एखाद्याच्या हातात सोपवत असेल कर यालाच मोदी गॅरंटी म्हणतात, असा खोचक टोला राऊतांनी आज पत्रकार परिषदेत लगावला.
शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही शंभर टक्के मराठी अस्मिता जपणारे पक्ष होते. मोदी-शाहांचा महाराष्ट्रावर राग आहे. त्यांना मराठी माणसांचा बदला घ्यायचा आहे. आता त्यांनी दोन्ही पक्षांची वाताहत करून दाखवलं की आम्ही महाराष्ट्राचा सूड घेतला. मात्र या राज्यातील जनता हा सूड उलटवून टाकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
Sharad Pawar : शरद पवार पक्षाचे सदस्यच नाहीत मग, अध्यक्ष कसे?; अजित पवार गटाचा युक्तिवाद