Sharad Pawar : ‘ईडीचा वापर हत्यार म्हणून… ; शरद पवारांचा थेट PM मोदींवर हल्लाबोल

Sharad Pawar : ‘ईडीचा वापर हत्यार म्हणून… ; शरद पवारांचा थेट PM मोदींवर हल्लाबोल

Sharad Pawar On PM Modi Criticism: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी सोलापुरात कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचे (काल) लोकार्पण करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोलापूर दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी जोरदार हल्लाबोल करत जोरदार टीका केली आहे. देशातील महागाईचा उल्लेख मोदींनी केला असता तर बरं झालं असतं, मोदींनी मूळ प्रश्नांना ठेंगा दाखवला आहे, असे म्हणत शरद पवारांनी मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. (Solapur News) तीस हजाराचा घरकुल प्रोजेक्ट आडम यांच्या मेहनतीचे फळ आहे, असेही मोदी म्हणाले.

प्रधानमंत्री, मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांना सोलापूर शहर आणि जिल्ह्यासाठीचे कांही प्रश्न आहेत. सोलापूर औद्योगिक नागरी होती, त्यासाठी नावे उद्योग उभं करण्याची गरज आहे. औद्योगिकरणामध्ये नीट लक्ष देण्याची गरज आहे. सोलापुरात कामगारांची संख्या प्रचंड आहे. इथे प्रधानमंत्री, मुख्यमंत्री अनेक मंत्री आले आणि गेले. त्याचा इथल्या लोकांच्या भवितव्यासाठी काही परिणाम झाला नाही. अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे.

अनिल देशमुख, संजय राऊत यांना हि इडीची नोटीस आली. अनिल देशमुख यांना 6 महिने आत ठेऊन नंतर सोडण्यात आले आहे. कोर्टाने त्यांची सुटका केली. संजय राऊत यांनी काही लिहिले असेल तर त्याचा राग म्हणून आत टाकले. भाजप ईडीचा वापर हत्यार म्हणून विरोधकांसाठी करत आहे. मला देखील नोटीस आलेली आहे. जर आठवड्याला एखादी तरी बातमी तुम्ही त्या संदर्भात छापता. सत्तेचा गैरवापर करून त्यांच्या विचारांशी सहमत नसलेल्यानां नाउमेद करायचं चालू आहे. रोहितला नोटीस आली यात चिंता करण्याचं कारण नाही आहे.नरसिंह रावांच्या काळात, मनमोहन सिंह यांच्या काळात असं चित्र नव्हतं. असे यावेळी शरद पवार म्हणाले.

पीएम मोदींनंतर ठाकरे गटाचेही ‘नाशिक’ पॉलिटिक्स; 22-23 जानेवारीला महाआरती अन् अधिवेशन

इंडिया आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कडून जयंत पाटील आणि जितेंद्र  आव्हाड  आहेत. शेकप, डावे, प्रकाश आंबेडकर यांच्याशी माझं बोलणं  झालं  आहे. त्यांना आमच्याकडे आणण्याचा विचार पक्का आहे. आघाडीची बिघाडी होईल असं कांही आम्ही होऊ देणार नाही. जरांगे पाटलांनी दिलेली आश्वासन पाळली नाहीत. असे यावेळी शरद पवार म्हणाले.

अजित पवार कुठून आलेत,त्यांना कोणी आणलं. त्यांना तिकीट कोणी दिलं. मी हुकूमशाह सारखं कधी वागलो नाही. मी पक्षात कधी सक्ती केली नाही. अशी टीका शरद पवारांनी यावेळी केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज