Sanjay Raut : ‘निवडणूक आयोग मोदी-शहांच्या मालकीचा, त्यांनी शिवसेना-राष्ट्रवादीची’.. राऊतांचा घणाघात

Sanjay Raut : ‘निवडणूक आयोग मोदी-शहांच्या मालकीचा, त्यांनी शिवसेना-राष्ट्रवादीची’.. राऊतांचा घणाघात

Sanjay Raut reaction on Election Commission Decision : केंद्रीय निवडणूक आयोगाने काल मोठा निकाल देत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला बहाल केलं. ऐन निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय आल्याने शरद पवार (Sharad Pawar) गटाला मोठा धक्का बसला आहे. आता शरद पवार गटाला लवकरात लवकर नवीन पक्ष चिन्ह आणि नावाची मागणी करावी लागणार आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू करण्यात आली आहे. आयोगाच्या या निर्णयावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या निर्णयावर जळजळीत टीका केली आहे. आजचा निवडणूक आयोग (Election Commission) हा भारतीय निवडणूक आयोग राहिलेला नाही. अमित शाह आणि मोदी यांच्या मालकीचा झाला आहे. आयोगाने लोकशाहीच्या पाठीत खंजीर खुपसला, अशी टीका राऊत यांनी केली.

“निवडणूक आयोग म्हणजे तडजोड बहाद्दर!” पक्ष अन् चिन्हाच्या निर्णयावर ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

निवडणूक आयोगाने अजित पवार गटाच्या बाजूने निकाल दिला. आयोगाच्या या निकालावर विरोधकांनी आगपाखड सुरू केली आहे. संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत आयोग आणि मोदी-शाहांवर घणाघाती टीका केली. राऊत पुढे म्हणाले, राष्ट्रवादीचा निकाल हा शिवसेनेसारखाच लागला. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. ते स्वतः आयोगासमोर येऊन बसले. तरीही आयोग पक्ष एका आयाराम गयाराम, ऐऱ्यागैऱ्याच्या हातात देतो. इतिहासात असा अन्याय कधी झाला नसेल. पक्षाचे संस्थापक समोर असताना जर आयोग संपूर्ण पक्षच एखाद्याच्या हातात सोपवत असेल कर यालाच मोदी गॅरंटी म्हणतात, असा खोचक टोला राऊतांनी लगावला.

शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही शंभर टक्के मराठी अस्मिता जपणारे पक्ष होते. मोदी-शाहांचा महाराष्ट्रावर राग आहे. त्यांना मराठी माणसांचा बदला घ्यायचा आहे. आता त्यांनी दोन्ही पक्षांची वाताहत करून दाखवलं की आम्ही महाराष्ट्राचा सूड घेतला. मात्र या राज्यातील जनता हा सूड उलटवून टाकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

Eknath Shinde : मेरिटच्या आधारेच पक्ष अन् चिन्हाचा निर्णय; CM शिंदेंच्या अजितदादांना शुभेच्छा 

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय जाहीर केला आहे. शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिली आहे. निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला उद्या (7 फेब्रुवारी) चिन्हाबाबत माहिती देण्यास सांगितले आहे. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पक्ष आणि चिन्ह कोणाला मिळणार याची उत्सुकता सर्वाना होती. आता पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्याचे जाहीर झाले आहे. त्यामुळे शरद पवार गटाला आगामी निवडणुका वेगळ्या चिन्ह आणि नावाने लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज