Sanjay Raut : भुजबळांचा राजीनामा स्वीकारला जात नसेल तर..; राऊतांना वेगळाच संशय

Sanjay Raut : भुजबळांचा राजीनामा स्वीकारला जात नसेल तर..; राऊतांना वेगळाच संशय

Sanjay Raut Reaction on Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने (Maratha Reservation) काढलेल्या अधिसूचनेविरोधात राज्यातील ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. ओबीसी एल्गार मेळाव्यांच्या माध्यमातून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. काल नगर शहरात ओबीसी एल्गार सभा झाली. या सभेत मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार (Manoj Jarange) टीका केली. तसेच आपण नोव्हेंबर महिन्यातच मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही भुजबळांच्या वक्तव्यावर भाष्य केले आहे.

छगन भुजबळांनी राजीनामा दिला आहे. मंत्रिमंडळात काम करू इच्छिता, ओबीसींसाठी काम करू इच्छिता आणि तुमचा राजीनामा स्वीकारला जात नसेल तर ही मिलीभगत आहे. आता तर लोक असे देखील म्हणत आहेत की भुजबळांच्या तोंडून फडणवीसच बोलत आहेत. मग त्यांचा राजीनामा कसा स्वीकारला जाईल? असा सवाल राऊत यांनी केला.

Sanjay Raut : ‘मनसे’ला महाविकास आघाडीत घेणार का? राऊतांनी थोडक्यात क्लिअरच केलं

छगन भुजबळ, मनोज जरांगे पाटील आणि धनगर समाजाच्या नेत्यांनी सरकारबरोबर बसून काय तो निर्णय घ्यायला हवा. कुणाच्याही ताटातलं काढून दुसऱ्या कुणाला काही मिळू नये. छगन भुजबळही अनेक दिवसांपासून तीच भूमिका मांडत आहेत. मात्र त्यासाठी इतक्या टोकाचा जातीयवाद निर्माण करण्याची काही गरज नाही. महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी ही गोष्ट नक्कीच चांगली नाही, असे राऊत म्हणाले.

काय म्हणाले होते भुजबळ ?

आता एकत्र येण्याची वेळ आली आहे. एकावर अन्याय झाला. तर सर्वांनी एकत्र आले पाहिजे. त्यासाठी मी 17 नोव्हेंबरला ओबीसींची पहिली रॅली अंबड येथे झाली आणि 16 नोव्हेंबरलां मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. ओबीसी एल्गार मेळावा मी राजीनामा देऊनच सुरू केला आहे. असं म्हणत भुजबळांनी मोठा गौप्यस्फोट केला. मला मुख्यमंत्र्यांचा अवमान करायचा नाही. एकनाथ शिंदे तुम्ही 27 तारखेला मोर्चाला सामोरे गेले. मात्र त्या ठिकाणी तुम्ही जाहीर केलं की, मी शपथ घेतली मराठा समाजाला आरक्षण देईल. ती शपथ पूर्ण झाली. मात्र संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळाल असेल तर मग मागासवर्ग आयोग आता जे काम करतय ते सर्व्हेक्षण कशासाठी आहे? असं भुजबळ म्हणाले होते.

Chhagan Bhujbal : अंबड रॅलीच्या आदल्या दिवशीच राजीनामा दिला होता; भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज