Chhagan Bhujbal : अंबड रॅलीच्या आदल्या दिवशीच राजीनामा दिला होता; भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट

Chhagan Bhujbal : अंबड रॅलीच्या आदल्या दिवशीच राजीनामा दिला होता; भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट

Chhagan Bhujbal : ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal ) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले की, 17 नोव्हेंबरला ओबीसींची पहिली रॅली अंबड येथे झाली आणि 16 नोव्हेंबरलां मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. ओबीसी एल्गार मेळावा मी राजीनामा देऊनच सुरू केला आहे. ते अहमदनगरमध्ये आज ओबीसी महाएल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये बोलत होते.

मराठ्यांना गुलाल उधळायची संधीच देणार नाही, ओबीसींचाच मुख्यमंत्री करू; शेंडगेंचा इशारा

आता एकत्र येण्याची वेळ आली आहे. एकावर अन्याय झाला. तर सर्वांनी एकत्र आले पाहिजे. त्यासाठी मी 17 नोव्हेंबरला ओबीसींची पहिली रॅली अंबड येथे झाली आणि 16 नोव्हेंबरलां मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. ओबीसी एल्गार मेळावा मी राजीनामा देऊनच सुरू केला आहे. असं म्हणत भुजबळांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. तर मंत्रिपदाचा राजीनामा मागण्याऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

Chhagan Bhujabal : मराठा समाजाला आरक्षण मिळालं मग सर्वेक्षण कसलं? भुजबळांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

तसेच यावेळी छगन भुजबळ (Chhagan Bhujabal ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना देखील सवाल केला. ते म्हणाले की, मला मुख्यमंत्र्यांचा अवमान करायचा नाही. एकनाथ शिंदे तुम्ही 27 तारखेला मोर्चाला सामोरे गेले. मात्र त्या ठिकाणी तुम्ही जाहीर केलं की, मी शपथ घेतली मराठा समाजाला आरक्षण देईल. ती शपथ पूर्ण झाली. मात्र संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळाल असेल तर मग मागासवर्ग आयोग आता जे काम करतय ते सर्व्हेक्षण कशासाठी आहे? असं भुजबळ म्हणाले आहेत.

आरक्षण नाही मिळाल तरी मराठा समाजाला ओबीसीच्या सवलती द्या अशी मागणी ते करत आहे. मराठा समाजाला जर सवलती देत असाल तर ब्राह्मण, जैन यांना देखील द्या फक्त मराठा समाजालाच का? असा माझा सवाल आहे. नाभीक समाजातील एका व्यक्तीने माझ्या समर्थनात पोस्ट टाकली. तर मराठा समाजाने त्याच्यावर बहिष्कार टाकला. याच्या दुकानात जाऊ नका म्हटले. त्यामुळे माझं न्हावी समाजाला आवाहन आहे. त्यांनी मराठा समाजाची भादरू नाही. त्यांची त्यांना त्यांच्यातच भादरू द्या, हा काय प्रकार सुरु आहे? महाराष्ट्रात असा सवाल भुजबळ यांनी केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube