मराठ्यांना गुलाल उधळायची संधीच देणार नाही, ओबीसींचाच मुख्यमंत्री करू; शेंडगेंचा इशारा

  • Written By: Published:
मराठ्यांना गुलाल उधळायची संधीच देणार नाही, ओबीसींचाच मुख्यमंत्री करू; शेंडगेंचा इशारा

Prakash Shendage speech Ahmednagar : कुणबी नोंदी असलेल्या मराठा समाजातील लोकांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन (Kunbi caste certificate) ओबीसी आरक्षणात (OBC reservation) समाविष्ट केले जाईल. याशिवाय कुणबी नोंद असलेल्या व्यक्तीच्या शपथपत्रावर त्यांच्या सगेसोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी सरकारने मान्य केली आहे. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात ओबीसी नेते एकवटले आहेत. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendage) हेही चांगलेच आक्रमक झालेत. आता मराठ्यांना गुलाल उधळायची संधीच देणार नाही, राज्यात ओबीसी मुख्यमंत्री आणि बहुजन सरकार आणू, असा इशारा त्यांनी दिला.

Chagan Bhujabal : मराठा समाजाला आरक्षण मिळालं मग सर्वेक्षण कसलं? भुजबळांचा मुख्यमंत्र्यांना सवाल 

आज अहमनगर शहरात ओबीसी मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्याला संबोधित करतांना शेंडगे म्हणाले की, जरांगेचं उपोषण सुटलं आणि मराठा समाजाने गुलाल उधळला. गुलाल उधळायची ही तिसरी वेळ होती. राणे समितीने मराठा समाजाला आरक्षण देण्याची शिफारस केली आणि ती महाराष्ट्र सरकारने मान्य केली होती, त्यावेळी तमाम मराठा समाजाने पहिल्यांदा गुलाल उधळलाय. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाची मागणी नसतांना त्यांना मागास ठरवलं. गायकवाड आयोगाच्या बाोगस अहवालाच्या आधारे मराठा आरक्षणाचं बील पास केलं तेव्हा दुसऱ्यांदा गुलाल उधलला. आणि आता शिंदे सरकारने 27 जानेवारीला मराठ्यांना बोगस आरक्षण दिलं, तेव्हाही मराठा समजाने गुलाल उधळला. मराठा समाज किती वेळा खोटा गुलाल उधळणार? असा सवाल शेंडगेंनी केला.

Gopichand Padalkar : सत्ताधारी जर माजले असतील तर सत्ता हिसकावून घ्या; अहमदनगरमधून पडळकरांचा हल्लाबोल 

आधी गुलाल उधळला, आणि आता तोच गुलाल झटकण्याचं काम मराठा नेतेच करत आहेत. हे फसवं आरक्षण असल्याची ओरड मराठा नेतेच करत आहेत, असंही शेंडगे म्हणाले.

दोन दिवसांपूर्वी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी छगन भुजबळांवर टीका केली होती. त्यावरही शेंडगेंनी भाष्य केलं. संजय गायकवाडला 2024 च्या निवडणुकीत लाथा घालणार. ओबीसी मतदार गायकवाडला लाथा घालूनच सत्तेतून बाहेर काढणार, असा इशाराही शेंडगेंनी दिला.

ते म्हणाले, निवडणुकीच्या रंणसंग्रामात ओबीसींचा झेंडा फडकणार आहे. आजवर ओबीसी मतदारांनी मराठा समाजाचे राजे मतपेटीतून बाहेर काढले. आता मतपेटीतून आपल्याला आपला राजा बाहेर काढायचा आहे. राज्यात ओबीसी मुख्यमंत्री आणि बहुजन सरकार आणायचं आहे. त्यासाठी गावागावत कामाला लागा. चावडीवर ओबीसींतील जाती एकत्रित आल्या तर मराठा समाजाचा साधा सरपंचही होणार नाही. आमदारकी, खासदारकी ह्या तर पुढच्या गोष्टी आहेत. त्यामुळं आपली मते फक्त ओबीसींना द्या… ओबीसी मुख्यमंत्री होईल तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात भंडारा उधळवू, मराठ्यांना गुलाल उधळायची संधीच मिळू देणार नाही, असं शेंडगेंनी ठणकावलं.

मागासवर्ग आयोगाचं सर्वेक्षण सुरू आहे. बंगला असला तर झोपडी सांगितल्या जातं. सरकारी नोकरी असली तर मजुरीला जातो असं सांगिल्या जातं. सगळं खोटं सर्व्हेक्षण सुरू आहे. मात्र, तुमचं आधारकार्ड हे बॅंकेशी जोडलेलं आहे. त्यामुळं ज्यांनी खोटी माहिती दिली, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असंही शेंडगे म्हणाले.

यावेळी अहमदनगरच्या नामकरणाच्या मुद्यावरही शेंडगे बोलले. नगरच्या नामकरणाच्या मागणीचा ठराव कॅबिनेटमध्ये मांडावा, अशी विनंती त्यांनी भुजबळांना केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube