राहुरीत अपघात! रुग्णालयाच्या गलथान कारभारामुळे तरुणाने जीव गमावला; कर्डिलेंचा आरोप

  • Written By: Published:
राहुरीत अपघात! रुग्णालयाच्या गलथान कारभारामुळे तरुणाने जीव गमावला; कर्डिलेंचा आरोप

राहुरी : नगर-मनमाड रोडवर (Nagar-Manmad Road Accident) आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला, दरम्यान, भाजपचे युवा जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले (Akshay Kardile) हे आज राहुरी दौऱ्यावर होते. त्यांना या भीषण अपघाताची माहिती मिळताच त्यांनी तातडीने जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात डॉक्टर, कर्मचारी उपस्थित नसल्यानं कर्डिलेंनी चांगलाच संताप व्यक्त केला.

लोकसभेत आघाडी पोटनिवडणुकीत मात्र बिघाडी; मित्रपक्षांची पाटी कोरीच राहिली.. 

सविस्तर वृत्त असे की, नगर-मनमाड रोडवर आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला, या भीषण अपघात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, अक्षय कर्डिले सध्या भाजपचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचारात व्यस्त आहेत. ते आज राहुरी दौऱ्यावर होते, त्यांना या भीषण अपघाताची माहिती मिळताच त्यांनी तातडीने जखमींना उचलून राहुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या त्यांच्या कृतीमुळे अक्षय कर्डिले यांचा दयाळू स्वभाव पाहायला मिळाला. मात्र, रुग्णालयात डॉक्टर, कर्मचारी उपस्थित नसल्यानं कर्डिलेंनी संताप व्यक्त केला.

ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत अक्षय कर्डिले धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला… 

याबाबत बोलतांना ते म्हणाले की, अपघात झाल्याचा मला फोन आल्यानंतर मी लगेच घटनास्थळी दाखल झालो आणि जखमींना रुग्णालयात दाखलं केलं. मात्र रुग्णालयात डॉक्टर किंवा कर्मचारी कुणीही उपस्थित नव्हतं. ग्रामीण रुग्णालयाच्या गलथान कारभारामुळं निष्पाण तरुणांना जीव गमवावा लागला. त्यामुळं संबंधित डॉक्टर, कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कर्डिलेंनी केली.

ते म्हणाले, राहुरी ग्रामीण रुग्णालयात कायम रुग्णांची वर्दळ असते. या रुग्णालयात डॉक्टर्स आहेत. मात्र, ते बऱ्याचदा गायब असतात. त्यामुळं रुग्णालयीन कार्यव्यवस्था पुर्णपणे कोलमडली. हजेरी पटावर हजेरी लावून डॉक्टर, कर्मचारी गायब होतात. त्यामुळं रुग्णांचे चांगलेच हाल होतात. आज डॉक्टर्स रुग्णालयात हजर असते तर जखमींचे प्राण वाचले असते, असं कर्डिले म्हणाले.

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ते पुढील तपास करत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube