लोकसभेत आघाडी पोटनिवडणुकीत मात्र बिघाडी; मित्रपक्षांची पाटी कोरीच राहिली..

लोकसभेत आघाडी पोटनिवडणुकीत मात्र बिघाडी; मित्रपक्षांची पाटी कोरीच राहिली..

Elections 2024 : राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. प्रत्येक जण आपला राजकीय फायदा आणि नुकसान याचा विचार करून निर्णय घेत असतो. लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections 2024) ज्यांच्याकडे फायदा दिसत होता त्यांच्याशी मैत्री केली पण आता पोटनिवडणुकीत चित्र बदललं आहे. लोकसभेतील मित्रांना बाजूला केलं जात आहे. उत्तर प्रदेशपासून राजस्थानपर्यंत होत असलेल्या पोटनिवडणुकीत हाच पॅटर्न दिसून येत आहे. मोठे राजकीय पक्ष आपल्या सहकारी असणाऱ्या अन्य राजकीय पक्षांना सोबत घेण्याचे टाळत आहेत. स्वबळावर निवडणुकीत उतरण्याचा त्यांचा विचार आहे.

राजस्थानात काँग्रेसने (Congress Party) बीएपी आणि आरएलपी यांना बरोबर घेत लोकसभा निवडणूक लढली होती. पण आताच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने या दोन्ही मित्रांना बाजूला सारलं आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने एकत्रित (Samajwadi Party) लोकसभा निवडणुक लढली होती. पण पोटनिवडणुकीत काँग्रेसला फार काही मिळालेलं नाही. भाजपनेही निषाद पार्टीला बाजूला केलं आहे. २०२२ मध्ये निषाद पार्टीने विजय मिळवलेल्या मजवा मतदारसंघात भाजप स्वतः लढणार आहे. याच पद्धतीने बिहारमध्ये राजदने (Bihar) काँग्रेसला एकही जागा दिलेली नाही.

भाजप सपाला सहकारी नको

उत्तर प्रदेशात ९ जागांवर पोटनिवडणूक होत आहे. याठिकाणी भाजप आणि समाजवादी पार्टी यांच्यातच मुख्य लढत होणार आहे. ९ पैकी ८ जागांवर भाजप स्वतः निवडणूक लढणार आहे तर मीरापुर मतदारसंघ सहकारी आरएलडीसाठी सोडण्यात आला आहे. निषाद पार्टीने मजवा आणि कटेहरी या दोन जागांची मागणी केली होती तर आरएलडीने मिरापूर आणि खैर जागांवर दावा केला होता. त्यानंतर भाजपने मिरापूर जागा आरएलडीला तर दिली पण निषाद पार्टीला एकही जागा दिली नाही.

झारखंडच्या निवडणुकीत ‘या’ नेत्यांची परीक्षा; पराभव झाला तर राजकारणच धोक्यात..

यूपीत सपा काँग्रेस एकसाथ

इंडिया आघाडीअंतर्गत (INDIA Alliance) समाजवादी पार्टी आणि काँग्रेसने एकत्र निवडणूक लढली होती. राज्यातील पाच जागा काँग्रेसकडून मागितल्या जात होत्या. समाजवादी पार्टी मात्र काँग्रेसला खैर आणि गाझियाबाद या दोन जागा देण्यास तयार होती. राजकीय समीकरणे पाहिली तर या दोन्ही मतदारसंघात भाजप अतिशय मजबूत आहे आणि या पोटनिवडणुकीतही या दोन्ही जागा भाजपाच जिंकण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत या दोन्ही ठिकाणी लढण्यापासून काँग्रेसने माघार घेतली आहे. या संधीचा फायदा घेत समाजवादी पार्टीने सर्व ९ जागांवर उमेदवार घोषित केले आहेत.

भाजप आणि सपाला स्वतः वर विश्वास

उत्तर प्रदेशातील या (Uttar Pradesh) पोटनिवडणुकीकडे २०२७ मधील विधानसभा निवडणुकांची सेमी फायनल म्हणून पाहिल जात आहे. याच कारणामुळे दोन्ही पक्ष आपल्या सहकारी पक्षांच्या तुलनेत स्वतः लढण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. भाजपने ८ जागांवर उमेदवार मैदानात उतरवले आहेत तर एक जागा जयंत चौधरी यांच्या (Jayant Patil) आरएलडीला दिली आहे. आपापल्या निवडणूक चीन्हांवर लढलो तर विजय पक्का हा धडा दोन्ही पक्षांनी लोकसभा निवडणुकीनंतर घेतल्याचे दिसत आहे.

राजस्थानात काँग्रेसला मित्र नको

राजस्थानातील सात विधानसभा (Rajasthan Politics) मतदारसंघांत पोटनिवडणूक होत आहे. काँग्रेसने या सर्व ठिकाणी उमेदवार दिले आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने हनुमान बेनिवाल यांच्या आरएलपी आणि राजकुमार रोत यांच्या बीएपी या पक्षांना सोबत घेत निवडणूक लढली होती. याचा फायदाही काँग्रेसला मिळाला. पण तरीही आताच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने या दोन्ही मित्रांना बाजूला सारलं आहे. राजस्थानातील ज्या सात जागी पोटनिवडणुका होत आहेत त्यातील चार जागा काँग्रेसच्या कोट्यातून रिक्त झाल्या आहेत. तर एक जागा भाजप आमदाराच्या निधनाने रिक्त झाली आहे.

झारखंडमध्ये बदललाय घराणेशाहीचा ट्रेंड; मुलगा नाही तर सूना सांभाळताहेत राजकीय वारसा

बीएपी प्रमुख राजकुमार रोत खासदार झाल्याने त्यांचा चौरासी मतदारसंघ रिक्त झाला आहे. तसेच हनुमान बेनिवाल (Hauman Benival) खासदार झाल्याने खींवसर मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. काँग्रेसने सातही मतदारसंघात उमेदवार घोषित केल्यानंतर हनुमान बेनिवाल यांनी आपल्या उमेदवारांची घोषणा करणार असल्याचे सांगितले. बीएपीने तर दोन मतदारसंघात उमेदवार फायनल देखील केले आहेत. यामुळे चार मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट लढत होणार आहे तर तीन मतदारसंघांत तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

बिहारमध्ये काँग्रेसला भोपळा

बिहारमधील चार मतदारसंघांत पोटनिवडणूक होत आहे. इंडिया आघाडीत काँग्रेस, राजद, व्हीआयपी आणि डाव्या पक्षांनी एकत्रित निवडणूक लढली होती. पण आता पोटनिवडणुकीत फक्त राजद आणि डावे पक्षच उतरले आहेत. इमामगंज, बेलागंज आणि रामगढ या ठिकाणी राजद तर तरारी मतदारसंघात सीपीआय (माले) लढत आहे. काँग्रेस आणि मुकेश सहनी यांच्या विकासशील इंसान पार्टीला (व्हीआयपी) एकही जागा मिळाली नाही. काँग्रेसकडून एक जागेची मागणी केली जात होती. पण राजदने काँग्रेसच्या मागणीकडे साफ दुर्लक्ष केले. अशा पद्धतीने आरजेडीने काँग्रेसपासून बाजूला होत स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube