अगोदर केला विरोध नंतर सांगितली वेदना; काँग्रेस नेते राहुल गांधींनी घेतली वाल्मिकी कुटुंबाची भेट
हरिओम यांच्या कुटुंबाला राहुल गांधी भेटण्यासाठी जाणार त्याचवेळी एक व्हिडिओ व्हायरलं झाला होता. त्यामध्ये राजकारणवार भाष्य केलं.

काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे जमावाच्या हिंसाचारात मृत्यू झालेल्या हरिओम वाल्मिकी यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी आज शुक्रवारी फतेहपूरला पोहोचले. राहुल गांधी यांनी हरिओम वाल्मिकी यांच्या कुटुंबाची त्यांच्या घरी भेट घेतली. यावेळी गांधी यांनी हरिओम वाल्मिकी यांच्या कुटुंबाशी संवाद साधला.
हरिओम यांच्या कुटुंबाला राहुल गांधी भेटण्यासाठी जाणार त्याचवेळी एक व्हिडिओ व्हायरलं झाला होता.या निवेदनात त्यांनी राजकारण न करण्याचं आवाहन केलं होते. सरकारने केलेल्या कारवाईवर आम्ही समाधानी आहेत, असंही ते म्हणाले होते. कुटुंबाने राहुल गांधींना भेटण्यास नकार दिला होता. राहुल गांधी यांच्या आगमनापूर्वी त्यांनी निषेधार्थ पोस्टर देखील लावले होते. मात्र, त्यांच्या कुटुंबावर कुणीतरी दबाव आणला आहे असं म्हणत राहुल गांधी यांनी हरिओम यांच्या कुटुंबाची भेट घेतली. या भेटीदरम्यान कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.
पंतप्रधान मोदी घाबरतात, ट्रम्प यांच्या दाव्यावर 5 कारण देत राहुल गांधींचा हल्लाबोल
यावेळी राहुल गांधी यांनी सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिले. कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी काँग्रेस पीडित कुटुंबाला न्यायालयात मदत करेल. कुटुंबाने पोलीस कोठडीतून सुटलेल्या सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी केली. सरकारी दबावाखाली, पोलीस प्रशासनाने त्यांना हरिओम वाल्मिकी यांच्या वडिलांना भेटण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला.
कानपूरमध्ये पोहोचलेल्या राहुल गांधींनी विमानतळावर स्थानिक नेत्यांशी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या कानपूरच्या शुभम द्विवेदी यांच्या कुटुंबाची विचारपूस केली. शुभमचे कुटुंब पाकिस्तानी संघासोबत क्रिकेट खेळण्यास विरोध करत होते. सामन्यानंतर त्यांनी निराशा व्यक्त केली. यावेळी काँग्रेस पक्ष आणि मी स्वत: तुमच्या सोबत आहे असा विश्वास राहुल गांधी यांनी त्यांना दिला.