ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत अक्षय कर्डिले धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला…
राहुरी : सामान्य माणूस अपघातग्रस्त (Accident) होवो वा तो दु:खात असतांना नेतेमंडळींना त्याचं कुठलंही सोयरंसुतक नसतं असं म्हटलं जातं. मात्र हे आज भाजप युवक जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले (Akshay Kardile) यांच्या कृतीनं खोटं ठरवलं. अक्षय कर्डिले सध्या भाजपचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile यांच्या प्रचारात व्यस्त आहेत. मात्र, नगर-मनमाड रोडवरील अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केलं.
धनंजय मुंडेंच्या विरोधात शरद पवारांचा मोठा डाव; परळीत मराठा कार्ड, कोण आहेत राजेसाहेब देशमुख?
नगर-मनमाड रोडवर आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला, त्यात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, अक्षय कर्डिले हे आज राहुरी दौऱ्यावर होते, त्यांना या भीषण अपघाताची माहिती मिळताच त्यांनी तातडीने जखमींना उचलून राहुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या त्यांच्या कृतीमुळे अक्षय कर्डिले यांचा दयाळू स्वभाव पाहायला मिळाला आहे.
जयश्री थोरात यांच्यावर गुन्हा दाखल; बाळासाहेब थोरात संतापले, विखेंवर घणाघात
दरम्यान, अक्षय कर्डिले हे एक संवेदनशील व्यक्तिमत्व असून अशा प्रसंगी तातडीने मदतीला जाण्याबाबत ते नेहमीच तत्पर असतात, आजही ते अपघातग्रस्तांच्या मतदीला धावून गेल्याची प्रचिती पुन्हा एकदा आली. त्यांचं वेगळेपण अधोरेखित करणारी ही कृती पाहून उपस्थितांमधून त्यांचं कौतुक झाले.