जयश्री थोरात यांच्यावर गुन्हा दाखल; बाळासाहेब थोरात संतापले, विखेंवर घणाघात

जयश्री थोरात यांच्यावर गुन्हा दाखल; बाळासाहेब थोरात संतापले, विखेंवर घणाघात

Case Filed Against Jayashree Thorat : कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात (Jayashree Thorat) यांच्यावर जमावबंदीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यांच्यासह 50 कार्यकर्त्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय. यामुळे संगमनेरमध्ये कॉंग्रेस ( Congress) कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत संतापाचं वातावरण आहे. जयश्री थोरातांवर खोटे आरोप लावण्यात आले आहेत, असा दावा कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी केलाय. याप्रकरणी जयश्री थोरात म्हणाल्या आहे की, मी फक्त संगमनेरची नाही तर महाराष्ट्राची लेक आहे. माझ्यावर अशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल करणं अन्यायकारक आहे.

जयश्री थोरात यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांचे वडील बाळासाहेब थोरात देखील प्रचंड संतापले आहे. याप्रकरणी प्रतिक्रिया देताना बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले आहेत की, देशमुखांचं वक्तव्य महाराष्ट्राने ऐकलं आहे. त्यांच्यावर वेळीच कारवाई न करता जयश्रींवर गुन्हा दाखल झालाय. सरकार हे पराकोटीचं दुर्दैवी कृत्य करतं आहे. राज्यातील जनता या कृत्याचा निषेध करेल. एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं अन् दुसरीकडे बहि‍णीचे हे हाल करायचे. हे केवळ मतांसाठी केलेलं कृत्य असल्याची टीका थोरातांनी केलीय.

फरार झालेल्या वसंत देशमुखच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या; जयश्री थोरातांबद्दल आक्षेपार्ह विधान

बाळासाहेब थोरात म्हणाले की, विखे (Sujay Vikhe) यांना टार्गेट करण्याचं कोणतंही कारण नाही. वक्तव्य करत असताना विखे देखील टाळ्या वाजवत होते. परंतु त्यांच्या पक्षातल्या काही लोकांना हे आवडलेलं नाही. महाराष्ट्रातील राजकारण पाच वर्षात बदललंय. परंतु कालच्या घटनेने तळ गाठलेला आहे. केवळ माझी मुलगी आहे म्हणून वाईट वाटत नसून संपूर्ण महिला वर्गाला दिलेली ही शिवी आहे. याप्रकरणी कायदेशीरपणे निवडणूक आयोगाकडे तक्रार करू, असा आक्रमक पवित्रा बाळासाहेब थोरात यांनी घेतलाय.

गेवराईत २०१९ ची पुनरावृत्ती?, अजित पवारांची विजयसिंह पंडितांना उमेदवारी, लक्ष्मण पवार अपक्ष?

भाजप नेते वसंतराव देशमुख (Vasant Deshmukh) यांना बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणं चांगलंच भोवलंय. याप्रकरणी जयश्री थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्याबाहेर 12 तास ठिय्या मांडला होता. त्यामुळे जयश्री थोरांतांवर जमावबंदीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी वसंतराव देशमुख यांना अटक केलीय. भाजप नेते सुजय विखे पाटील यांच्या सभेमध्ये वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.

याप्रकरणी त्यांच्यावर संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुख यांना अखेर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांना अहमदनगर जिल्ह्याच्या बाहेरून पोलिसांनी ताब्यात घेतलंय. वसंतराव देशमुख त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते. त्यानंतर पोलिस देशमुखांच्या मागावर होते. त्यांना लवकरच कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube