Congress First list : मोठी बातमी! काँग्रेसच्या 54 उमेदवारांची यादी निश्चित; महत्त्वाची नावं आली समोर
Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. 20 ऑक्टोबर रोजी भाजपाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपाच्या पहिल्या यादीत एकूण 99 उमेदवारांची नावं आहेत. त्यानंतर आता काँग्रेसच्या गोटातून जागावाटपासंदर्भात मोठी माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसमध्ये एकूण 54 उमेदवारांची नावं निश्चित झाली आहेत. (Congress) त्यामुळे या उमेदवारांची पहिली यादी उद्या म्हणजेच 22 ऑक्टोबर रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. यातील काही उमेदवारांची नावं समोल आली आहेत.
Beed Politics : भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्केंची पक्षाला सोडचिठ्ठी, अपक्ष निवडणुक लढवणार?
निश्चित झालेल्या उमेदवारांची नावं
नाना पटोले – साकोली
विरेंद्र जगताप- धामणगाव
यशोमती ठाकूर- तिवसा
विजय वडेट्टीवार- ब्रमपुरी
अमित झनक- रिसोड
नितीन राऊत- उत्तर नागपूर
विकास ठाकरे- पश्चिम नागपूर
रणजित कांबळे- देवळी (वर्धा)
सुभाष धोटे- राजूरा ( चंद्रपूर)
डॉ सुनील देशमुख – अमरावती शहर
बबलू देशमुख- अचलपूर
विदर्भातील जागांवरून वाद
महाविकास आघाडीत सध्या विदर्भातील जागांवरून वाद चालू आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला विदर्भात एकूण 12 जागा हव्या आहेत. तर काँग्रेस शिवसेनेला 8 जागा देण्यास तयार आहे. या भागात आमची ताकद जास्त असून आम्हीच या भागातून अधिक जागांवरून निवडणूक लढवणार, अशी काँग्रेसची भूमिका आहे. मात्र ठाकरेंची शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम आहे. यावर तोडगा काढण्यासाठी 20 ऑक्टोबर रोजी अनेक बैठका पार पडल्या. मिळालेल्या माहितीनुसार आता या जागांवर जवळपास तोडगा निघालेला आहे. त्यामुळे आगामी काळात लवकरच महाविकास आघाडी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जागावाटपाची घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भाजपाच्या पहिल्या यादीत 99 जणांची नावं
कालच भाजपकडून 99 उमेदवारांची पहिली उमेदवारी यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. या उमेदवारी यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा, राम कदम अशा प्रमुख नेत्यांच्या समावेश होता. भाजपची दुसरी उमेदवारी यादी कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. या उमेदवारी यादीवर नजर टाकल्यास महायुतीचा जागावाटपाचा नवा फॉर्म्युला समोर आला आहे. त्यानुसार भाजप 158, शिंदे गट 85 आणि अजितदादा गट 45 जागांवर लढण्याची शक्यता आहे.