Congress: काँग्रेसकडून विधानसभेची मोर्चेबांधणी; उद्या थोरातांच्या उपस्थितीत ‘महासंकल्प मेळावा’
Maharashtra Assembly Election 2024 : देशात लोकसभा निवडणुका पार पडल्या. राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं. त्यानंतर सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. नगर जिल्ह्यातील काँग्रेस देखील आता मैदानात उतरली आहे. उद्या गुरुवार दुपारी ४.३० वा. नगर शहरातील माऊली सभागृहात राज्याचे माजी महसूल मंत्री तथा काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा ‘महासंकल्प मेळावा’ आयोजित करण्यात आल्याची माहिती ग्रामीण जिल्हाध्यक्ष जयंत वाघ व शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिली आहे.
एकही जागा नाही एक प्रकरण लीक अन् पेटला वनवा; पूजा खेडकर कुटुंबाचा आठ कंपन्यांशी संबंध, नातेवाईकांचा सहभाग?
वाघ व काळे म्हणाले की, मागील आठवड्यात राष्ट्रीय महासचिव खा.वेणुगोपाल, राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रदेश काँग्रेसने मुंबईत नगर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकी संदर्भात सविस्तर आढावा घेतला. यावेळी काँग्रेसने लढत असलेल्या यापूर्वीच्या संगमनेर, श्रीरामपूर, राहता या, तसेच दक्षिणेतील नगर शहरासह एकूण सात जागांवर दावा केला आहे. काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे. महायुतीला रोखण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील एकही जागा काँग्रेस लढली नाही. तरी आघाडी धर्म निभावत दोन्ही उमेदवारांसाठी आ.थोरातांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठे प्रयत्न केले.
जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न
यामध्ये जयंत वाघ म्हणाले, आता विधानसभेसाठी सात जागा काँग्रेसला मिळाव्यात अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. नगर शहरासह श्रीगोंदा, कोपरगाव, अकोले या मतदारसंघांवर देखील आम्ही दावा केला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. महाविकास आघाडी अधिक बळकट करत असताना काँग्रेस पक्षाचा राज्यात जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे. नगर जिल्ह्यातून देखील काँग्रेसचे जास्तीत जास्त आमदार निवडून यावेत अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यासाठी संघटनात्मक पातळीवर पक्षाची जोरदार बांधणी सुरू आहे.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
काळे म्हणाले की, थोरात हे राज्यातील ज्येष्ठ आमदार आहेत. आगामी विधानसभा तसंच येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच निवडणुकांसाठी काँग्रेस बळकट करण्याची मोहीम पक्षाने हाती घेतली आहे. मेळाव्याच्या माध्यमातून पक्षाचे ज्येष्ठ नेते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. यावेळी आमदार लहू कानडे यांच्यासह नगर शहर व ग्रामीण जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, पक्षाच्या विविध आघाड्या, फ्रंटल, सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची उपस्थिती असणार आहे. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील.
थोरात संवाद साधणार पूजा खेडकर मसुरीला गेल्याच नाहीत? मुदत संपल्यानंतरही नॉट रिचेबल
जून महिन्यात राष्ट्रवादी एसपी पक्षाचा वर्धापन दिनाचा राज्यस्तरीय मेळावा नगर शहरात झाला. त्यानंतर शिवसेना उबाठाचे नेते राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी जिल्ह्यात श्रीगोंदा मतदारसंघाचा दौरा केला. नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार दक्षिणेचा दौरा केला. यानंतर आता ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेस विधानसभा निवडणुकीचे रणशिंग महासंकल्प मेळाव्याच्या माध्यमातून नगर शहरातून फुंकणार आहे. यावेळी थोरात कार्यकर्त्यांना काय संदेश देतात याकडं जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.