आशुतोष काळेंच्या निर्णयामुळे कोल्हेंची कोंडी, कोणता झेंडा हाती घेणार?

  • Written By: Published:
आशुतोष काळेंच्या निर्णयामुळे कोल्हेंची कोंडी, कोणता झेंडा हाती घेणार?

Ashutosh Kale Vs Snehalata Kolhe : अजित पवार हे सत्तेत सहभागी झाल्याने अनेक मतदारसंघातील राजकीय गणिते बदलली आहेत. ज्यांच्याविरोधात निवडणुका लढल्यात त्यांच्याबरोबर जाणे अनेकांसाठी राजकीयदृष्ट्या धोक्याचे झाले आहे. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघात तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. आता कोपरगावचे आमदार आशुतोष काळे हे अजित पवार (Ajit Pawar) गटात दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांचे पारंपरिक विरोधक कोल्हे कुटुंबाची मोठी कोंडी झाली आहे. या मतदारसंघात काळे व कोल्हे कुटुंबातील तीन पिढ्यांमध्ये एकमेंकाविरोधात राजकीस संघर्ष झाला आहे. त्यामुळे आता कोल्हे कुटुंब वेगळी भूमिका घेईल, अशा राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. (Ahmednagar politics Ashutosh kale join Ajit pawar group, kolhe political option)

नगर जिल्ह्यात अजित पवार गटाला निलेश लंके, संग्राम जगताप, किरण लहामटे या तीन आमदारांनी पाठिंबा दिला होता. आशुतोष काळे हे परदेशात गेले होते. त्यांनी थेट तेथून प्रतिज्ञापत्र देऊन अजित पवारांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सहा पैकी चार आमदार अजितदादांबरोबर गेले आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील राजकीय गणितेही बिघडली आहेत. त्यात कोपरगाव मतदारसंघात काळे व कोल्हे यांच्यात मोठा राजकीय संघर्ष आहेत.

वळसेंना मतदारसंघात जाऊन उत्तर देणार; आमदार रोहित पवार आक्रमक

आता आशुतोष काळे हेच कोपरगाव मतदारसंघातून उमेदवार राहतील. त्यामुळे स्नेहलता कोल्हे यांची राजकीय कोंडी झाली आहे. गेल्या दोन निवडणुकीत ते एकमेंकाविरोधात लढले आहेत. २०१४ मध्ये कोल्हे यांनी काळेंचा पराभव केला होता. मागील २०१९ च्या निवडणुकीत मात्र आशुतोष काळे यांनी कोल्हे यांचा अवघ्या ८३५ मतांनी पराभव केला होता. त्यावेळेच आशुतोष काळेंना विखेंनी मदत केल्याचा आरोपही कोल्हेंनी केला होता.

तर नुकतेच झालेल्या गणेश साखर कारखान्याच्या निवडणुकीत विवेक कोल्हे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी एकत्र येऊन मंत्री राधाकृष्ण विखेंच्या पॅनलचा धुव्वा उडविला होता. त्यामुळे विखे यांच्याशी कोल्हे यांची सख्य नाही. आता पारंपरिक विरोधकच भाजपबरोबर आलेला आहे. गणेशच्या निवडणुकीत विखेंबरोबर खटके उडालेले आहेत. त्यामुळे आताही कोल्हे यांची कोंडी झालेली आहे. त्यात गणेशच्या निवडणुकीतून ते बाळासाहेब थोरातांच्या जवळच गेलेले आहेत. त्यामुळे त्यांना काँग्रेसचा पर्याय आहे. परंतु पक्ष म्हणून काँग्रेसची ताकद तेथे कमी आहे. कोल्हे कुटुंबपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. तर काळे कुटुंब हे शिवसेनेत होते. त्यामुळे शरद पवार गटाचा पर्यायही त्यांच्यासमोर आहे.

खासदार विखेंकडून पवारांवर जहरी टीका, म्हणाले, उद्धव ठाकरेंसारखाच…

याबाबत ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक भागा वरखडे सांगतात की, काळे व कोल्हे हे पारंपरिक विरोधक आहेत. त्यामुळे सध्याच्या राजकीय परिस्थितीत दोघांचे एकमत होऊ शकत नाही. त्यामुळे कोल्हे हे वेगळा मार्गही निवडू शकतात. ते काँग्रेस, शरद पवार गटापेक्षा शिवसेनेची (ठाकरे गट) निवड करतील. कारण येथे ठाकरे गटाचे ताकद जास्त आहे.

या राजकीय कोंडीत कोल्हे कुटुंब काय निर्णय घेतात हे काही दिवसच दिसणार आहे. या राजकीय घडामोंडीमुळे भाजपबरोबर गेलेल्यांची नक्कीच कोंडी झालेली आहे. ती कोंडी कशी फुटते हे आगामी काळात समोर येईल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube