खासदार विखेंकडून पवारांवर जहरी टीका, म्हणाले, उद्धव ठाकरेंसारखाच…
रोहित पवारांवरही (Rohit Pawar) उद्धव ठाकरेंसारखाच परिणाम झाला असल्याची जहरी टीका भाजपचे खासदार सुजय विखे (Sujay Vikhe Patil) पाटलांनी केली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर केलेल्या टीकेनंतर भाजपच्या नेत्यांचा उद्धव ठाकरेंवर रोख आहे. अशातच भाजपच्या नेत्यांकडून उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर देण्यात असून आता उद्धव ठाकरेंनंतर भाजपचे खासदार सुजय विखे यांनी रोहित पवारांवर टीकास्त्र सोडलं आहे. (BJP Mp Sujay Vikhe Patil Critisize Ncp Mla Rohit pawar)
‘मी अदिती तटकरेंपेक्षा चांगलच काम करेन, महिला-पुरुषांत फरक असतोच ना’; गोगावलेंचं वादग्रस्त वक्तव्यhttps://t.co/yVknwDgVbD #MaharashtraPolitics #MaharashtraPoliticalCrisis #MumbaiNews #BJP #NCPCrisis
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) July 12, 2023
पुढे बोलताना सुजय विखे म्हणाले, आम्ही तीन वर्षांपूर्वीपासूनच महाविकास आघाडी सरकार असताना सांगत होतो की, आमदार पळून जाणार आहे, आम्ही जे बोलायचो ते खरं झालंय, त्यात कालावधी गेला आहे. सध्या राज्यात जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरेंचा जेवढा वाटा आहे, त्यांच्यापेक्षा मोठा वाटा रोहित पवार यांचा असल्याचं ते म्हणाले आहेत.
CM शिंदे अन् भाजपाच्या शिलेदारांना अभ्यासाची अधिक गरज; खाते वाटपापूर्वी आमदारांची ‘प्रगती’ समोर
तसेच राज्यातील परिस्थितीचा उद्धव ठाकरेंवर परिणाम झाला आहे, अगदी तसाच परिणाम राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांवरही झाला आहे. उद्धव ठाकरे आणि रोहित पवारांनी मिळून राज्यात एक मनोपुली करुन राजकारण केलं आहे. सत्तेत असताना आमदारांना निधी वाटप, ठराविक नेत्यांनाच महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेतृत्वाने प्राधान्य दिलं, त्यामुळेच राज्यातील नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती, असंही सुजय विखेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर होते. विदर्भ दौऱ्यावर असताना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना डिवचलं होतं. नागपुरचा कलंक या शब्दांत ठाकरेंनी फडणवीसांव टीका केली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांकडूनही या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आल्याचं दिसून आलं होतं. एवढचं नाहीतर भाजपच्या अनेक नेत्यांकडून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत टीका-टीपण्या केल्याचं दिसून आलं. आता उद्धव ठाकरे यांच्यानंतर रोहित पवारांवर सुजय विखेंनी थेट टीका केल्याने रोहित पवार काय प्रतुयत्तर देणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.