CM शिंदे अन् भाजपाच्या शिलेदारांना अभ्यासाची अधिक गरज; खाते वाटपापूर्वी आमदारांची ‘प्रगती’ समोर

CM शिंदे अन् भाजपाच्या शिलेदारांना अभ्यासाची अधिक गरज; खाते वाटपापूर्वी आमदारांची ‘प्रगती’ समोर

Maharashtra Politics : राज्य सरकारमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची गडबड सुरू असताना तसेच पावसाळी अधिवेशन तोंडावर आलेले असतानाच शिंदे गट आणि भाजपाच्या आमदारांचे टेन्शन वाढविणारी बातमी आली आहे. प्रजा फाउंडेशनने मुंबईतील विद्यमान आमदारांच्या दोन वर्षातील घटनात्मक आणि वैधानिक कर्तव्यांशी संबंधित एक मूल्यमापन अहवाल जारी केला आहे. अधिवेशन काळातील भाजपाच्या आमदारांची कामगिरी खालावल्याची धक्कादायक माहिती या अहवालातून समोर आली आहे.

फाउंडेशनने मुंबईतील आमदारांचे प्रगती पुस्तक 2023 प्रकाशित केले आहे. भारतीय जनता पार्टीच्या आमदारांची कामगिरी खालावल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. शिंदे गटाचे आमदारही पिछाडीवर पडले आहेत. दुसरीकडे ठाकरे गटाच्या आमदारांनी मात्र त्यांची कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न केल्याचे या अहवालात म्हटले आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाचे तुरुंगातील अट्टल गुन्हेगारांशी कनेक्शन; संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई भाजपाचे अध्यक्ष अॅड. आशिष शेलार मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पिछाडीवर पडल्याचे अहवालात म्हटले आहे. ते सातव्या क्रमांकावर होते. यंदा नवव्या क्रमांकावर आली आहे. त्यांच्या कामगिरीत दोन अंकांची घसरण झाली आहे. अमित साटम यांचा चौथा क्रमांक मात्र कायम राहिला आहे. आमदार भारती लव्हेकर यांनी 13 व्या क्रमांकावरून सहाव्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

पराग शाह यांच्याही कामगिरीत सुधारणा झाल्याचे या अहवालावरून दिसून येत आहे. शाह यांचा नंबर आधी 14 वा होता ते थेट आता 5 व्या क्रमांकावर आले आहेत. आमदार मिहीर कोटेचा 15 व्या क्रमांकावरून 11 व्या क्रमांकावर आले आहेत. योगेश सागर यांच्या कामगिरीत मात्र घसरण झाली आहे. 10 व्या क्रमांकावरून 14 व्या क्रमांकावर घसरल्याचे या अहवालात म्हटले आहे.

‘अजितदादांच्या शपथविधीची माहिती शिंदेनाही नव्हती’; बच्चू कडूंचे धक्कादायक विधान

कालिदास कोळंबकर 12 व्या क्रमांकावरून 20 व्या क्रमांकावर पोहोचले आहेत. पराग अळवणी दुसऱ्या क्रमांकावरून 7 व्या क्रमांकावर आले आहेत. सोशल मीडियावर भाजपाची बाजू अतिशय आक्रमकपणे मांडणारे आमदार अतुल भातखळकर 5 व्या क्रमांकावरून थेट 17 व्या क्रमांकावर फेकले गेले आहेत.

शिंदे गटातील आमदार प्रकाश सुर्वे 30 व्या क्रमांकावरून 25 व्या क्रमांकावर आले आहेत. मंगेश कुडाळकर मात्र 9 व्या क्रमांकावरून 13 व्या क्रमांकावर घसरले आहेत. सदा सरवणकर 21 व्या क्रमांकावरून 28 व्या क्रमांकावर आले आहेत. दिलीप लांडे हे 23 व्या क्रमांकावरून 27 व्या क्रमांकावर आले आहेत. एकूणच शिंदे गटातील आमदारांची कामगिरी खालावल्याचे दिसत आहे.

ठाकरे गटाचे आमदार दमदार

ठाकरे गटाचे आमदार रमेश कोरगावकर यांनी 26 व्या क्रमांकावरून 24 व्या क्रमांकावर आले आहेत. संजय पोतनीस 22 व्या क्रमांकावरून 21 व्या क्रमांकावर आले आहेत. खासदार संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांच्या कामगिरीत मात्र घसरण झाल्याचे अहवाल म्हणतो. सुनील राऊत यांचा आधी 20 क्रमांक होता ते आता 29 व्या क्रमांकावर गेले आहेत. रवींद्र वायकर 31 व्या क्रमांकावरून 22 व्या क्रमांकावर पोहोचले आहेत. अजय चौधरी 24 व्या क्रमांकावरून 19 व्या क्रमांकावर पोहोचले आहेत.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube