‘अजितदादांच्या शपथविधीची माहिती शिंदेनाही नव्हती’; बच्चू कडूंचे धक्कादायक विधान

‘अजितदादांच्या शपथविधीची माहिती शिंदेनाही नव्हती’; बच्चू कडूंचे धक्कादायक विधान

Bachchu Kadu : राष्ट्रवादी काँग्रेसमधून सरकारमध्ये आलेल्या अजित पवार गटाच्या शपथविधीची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ऐनवेळी दिली गेली असावी. त्यामुळेच आमच्या शपथविधीचा विचार झाला नसावा, असा धक्कादायक गौप्यस्फोट प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी केला. राज्यातील सध्याचे सरकार मजबूत असले तरी ते कधीही कोसळू शकते, असा इशाराही त्यांनी दिला.

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अजूनही झालेला नाही. शिंदे गटातील आमदारांना मंत्रीपदे मिळणार अशी चर्चा होत असतानाच ऐनवेळी अजित पवार गटाने सरकारमध्ये एन्ट्री घेतली. सत्तेत तिसरा वाटेकरी आला. या घडामोडींमुळे शिंदे गटातील आमदार अधिकच संतप्त झाले आहे. आ. कडू सातत्याने खदखद व्यक्त करत आहेत.

मोदींच्या प्रचारावरुन मिटकरींनी अजितदादांना पाडलं तोंडावर; म्हणाले, ते त्यांचं वैयक्तिक मत

कडू पुढे म्हणाले, अजित पवारांना अर्थमंत्रीपद मिळू नये अशी आमच्या गटातील आमदारांची इच्छा आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अर्थमंत्री असताना पवारांनी निधी पळवापळवी केली. त्यामुळे आम्ही इकडे आलो. अजित पवार यांचा आमच्या मतदारसंघातील हस्तक्षेप कदापि सहन करणार नाही. हे तीन इंजिनचे सरकार आहे. मजबूत आहे पण केव्हाही कोसळू शकते, असा इशारा कडू यांनी दिला.

सत्ताधारी पक्षाचे 90 टक्के आमदार मुंबईत आहेत. हाच बच्चू कडू आणि इतर आमदारांतील फरक आहे. आता इतके आमदार सांभाळायचे म्हटले तर थोडी नाराजी होणारच. सगळे आनंदी आहेत असे नाही. सगळे सुखी राहतील असा सुखी माणसाचा सदरा अजून तरी आलेला नाही, असे कडू म्हणाले.

Crime : राजधानी दिल्ली पुन्हा हादरली : तुकड्या-तुकड्यांमध्ये आढळला युवतीचा मृतदेह

दरम्यान,  राष्ट्रवादीत बंड करून अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्या असल्या तरी विस्तार अजूनही झालेला नाही. शिंदे गट आधीच नाराज आहे त्यात अजित पवारांचा गट दाखल झाल्याने कोणाला कोणते खाते द्यायचे, यासाठी मोठीच कसरत करावी लागत आहे. आपले खाते जाते की काय या विचाराने भाजपाच्या मंत्र्यांच्या पोटातही गोळा उठला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube