Crime : राजधानी दिल्ली पुन्हा हादरली : तुकड्या-तुकड्यांमध्ये आढळला युवतीचा मृतदेह

Crime : राजधानी दिल्ली पुन्हा हादरली : तुकड्या-तुकड्यांमध्ये आढळला युवतीचा मृतदेह

Crime : दिल्ली : देशात गेल्या काही दिवसांपासून खून आणि नंतर मृतदेहाचे तुकडे करण्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशात राजधानी दिल्ली पुन्हा एकदा हादरली आहे. गीता कॉलनी उड्डाणपुलाजवळ युवतीचा तुकड्या-तुकड्यांमध्ये मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (12 जुलै) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास या मृतदेहाबाबत माहिती मिळाली. त्यानंतर घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी मुलीच्या मृतदेहाचे काही डोके एकीकडे होते, तर शरीराचे अन्य भाग विखुलेल्या अवस्थेमध्ये होते. (Delhi Police recovers the body of a woman, chopped into several pieces from near Geeta Colony flyover area)

दरम्यान, मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नसून ओळख पटविण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.पंचनाम्यानंतर पोलिसांनी उड्डाणपुलाला लागून असलेल्या जंगलात शोधमोहीम सुरू केली आहे. मृतदेहाचे आणखी काही भाग जंगलात सापडण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. देशाच्या राजधानीत अशा प्रकारे भर रस्त्यात उड्डाणपुलाजवळ तुकडे केलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळून आल्याने अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित होत आहेत.

मागील वर्षी दिल्लीत श्रद्धा वालकर हत्येचे प्रकरण देशभर गाजले होते. गेल्या वर्षी 18 मे रोजी दिल्लीतील मेहरौलीमध्ये श्रद्धाचा प्रियकर आफताब याने तिची गळा आवळून हत्या केली होती. यानंतर त्याने मृतदेहाचे 35 तुकडे केले होते. मृतदेह ठेवण्यासाठी आफताबने फ्रीज विकत घेतला होता. यामध्ये त्याने मृतदेहाचे तुकडे ठेवले. तो रोज रात्री श्रद्धाच्या मृतदेहाचा तुकडा मेहरौलीच्या जंगलात टाकण्यासाठी जात असे. इतकंच नाही तर श्रद्धाच्या हत्येनंतरही आफताब त्याच फ्लॅटमध्ये राहत होता, त्याच्या इतर मैत्रिणीही त्याला भेटायला या फ्लॅटमध्ये येत होत्या.

त्यानंतर यावर्षी फेब्रुवारी महिन्यात दिल्लीतील निक्की यादव हत्याकांड समोर आले होते. यात आरोपी साहिल गेहलोत याने प्रेयसी निकिता यादवचा डेटा केबलने गळा आवळून खून केला होता. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने त्याने निकिताचा मृतदेह त्याच्या ढाब्याच्या फ्रीजमध्ये लपवून ठेवला. निक्कीचा खून केल्यानंतर आरोपीने त्याच दिवशी दुसऱ्या मुलीशी लग्नही केले होते. मिळालेल्या माहितीनुसार कुटुंबियांनी साहिलचे लग्न ठरविले होते. मात्र निक्कीचा अडसर दूर करण्यासाठी त्याने तिचा खून केला.

यानंतर जून महिन्यात मुंबईतील सरस्वती वैद्य हिच्या हत्येचे प्रकरण समोर आले आहेत. मीरा रोडमध्ये परिसरात लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रियकर मनोज साने याने आपली प्रेयसी सरस्वती वैद्य हिची निर्घृण आणि अमानवीय पद्धतीने हत्या केली. आरोपीने सरस्वतीच्या मृतदेहाचे लहान लहान तुकडे करुन ते प्रेशर कुकरमध्ये शिजवून नाल्यात फेकले होते. पळून जाण्याच्या तयारीत असतांना पोलिसांनी त्याला अटक केली होती. यानंतर आता पुन्हा एकदा राजधानी दिल्लीत मृतदेहाचे तुकडे करुन विल्हेवाट लावण्याचा प्रकार समोर आला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube