अधिवेशनाचा आज दुसरा दिवस; संयमी नेते बाळासाहेब थोरात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक
Assembly Monsoon Session : कायम शांत असणारे, संयम ठेवणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आज सभागृहात शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर मोठे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. शेतकऱ्यांच्या मदतीवर थोरात म्हणाले, एकंदर मागील वर्ष पाणी टंचाईच होत. परंतु, काही शेतकऱ्यांनी शेती पिकवली. (Assembly Session) परंतु, जो अवकाळी पाऊस झाला. (Monsoon Session) त्यामध्ये मोठं मोठं वादळ होतं. फळ बागांसह शेतकऱ्याची पिकं कोलमडून पडली होती. कोणतंच उत्पन्न शेतकऱ्यांना मिळालं नाही. हे सगळं झालं असताना फक्त कागद फिरत राहतात असा थेट घणाघात थोरात यांनी यावेळी केला.
आज राज्यात कोसळ धार! पुण्यासह कोकण, मराठवाडा, विदर्भातील ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
सरकार म्हणून तुमच्या मनात शेतकऱ्यांविषयी कोणताचं ओलावा नाही. कसलीच सहानूभुती नाही. सहा महिन्यानंतर आता सांगतायेत असा सर्वे येणार आहे. तसा सर्वे येणार आहे. फार फार तर दोन महिन्यांत मदत व्हायला हवी होती. परंतु, सहा सहा महिने मदत होत नसेल तर काय म्हणायचं. ही अशी कधीच पद्धत नव्हती अस म्हणत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी थेट प्रश्न उपस्थित करत सरकारवर नाकर्तेपणाचा थेट आरोप केला.
कृषी मंत्री काय उत्तर देतात
विरोधी पक्षनेते विजय वड्टेटीवरही यावेळी आक्रमक झाले होते. गेल्या सहा महिन्यांत कोणतीच मदत झाली नसल्याने रोज एक आत्महत्या होत आहे. तरीही सरकार जाग होत नाही असं म्हणत त्यांनी हे सरकार नाकाम सराकर आहे असा गंभीर आरोप केला. दरम्यान, वेळ संपल्याचं म्हटल्यावर शेतकऱ्यांवर तुम्ही आम्हाला बोलू देणार नाही का? कृषी मंत्री काय उत्तर देतात. आम्ही प्रश्नही विचारायचे नाही का? असे प्रश्न उपस्थित करत वडेट्टीवार हे विधानसभा अध्यक्षांसह सत्ताधाऱ्यांवरही संतापल्याचं पाहायला मिळालं.